संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये शनिवार, दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘आयुर्वेदाचे घरी, आरोग्य वास करी’ या अंर्तगत परिसंवाद, मार्गदर्शन आणि प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांचे बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहरातील प्रत्येक कुटूंबाला, कुटूंबातील लहानथोरांपासून आबालवृद्धापर्यंत प्रत्येकालाच भारतीय संस्कृतीने निर्माण केलेल्या आर्युवेदाचे संरक्षण कवच कसे आणि का प्राप्त करून द्यायचे यावर प्रश्नोत्तरे, चर्चासत्र, मार्गदर्शन, शंकांचे समाधान व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या आयोजक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधण्यासाठी विख्यात आर्युवेद तज्ज्ञ डॉ. मालविका तांबे (कार्ला) सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आर्युवेद जाणून घेण्यासाठी व आपल्या जीवनातील त्याचे महत्व समजून घेण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गोवर्धनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.