स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६ ; Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ईद ए मिलाद निमित्त शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी नेरूळमधील महापालिकेच्या माता बाल रुग्णालयात एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने फळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि नवी मुंबई-रायगडचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी दिली.
या फळवाटपाबाबत हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनाही लेखी निवेदन दिले असून त्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी निमत्रंणही दिले आहे.
गणेश विसर्जन व ईद ए मिलाद २८ सप्टेंबर २०२३ रोजी एकत्रच येत असल्याने आम्ही मुस्लिम बांधवांनी गणेशविसर्जनाचे पावित्र्य व महत्व पाहता आम्ही ईद ए मिलाद दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करत आहोत. या दिवशी एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने महापालिकेच्या नेरूळमधील माताबाल रुग्णालयात फळ वाटप करणार आहोत. या कार्यक्रमास आपण परवानगी द्यावी व आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ मिळाल्यास आपणही या समोजोपयोगी कार्यक्रमात सहभागी झालात तर आम्हालाही आनंदच होईल. आपण नेरूळमधील माताबाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनाही कल्पना द्यावी. आपण कार्यक्रमासाठी आलात तर आम्हाला मनापासून आनंदच होईल, असे हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.