नवी मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या पाठपुराव्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. सानपाडा सेक्टर ९ मधील महापालिकेच्या भुखंड क्रंमाक ३ वरील क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था संपुष्ठात आल्याने सानपाडावासियांकडून पांडुरंग आमले यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा करताना समस्या सोडविल्याबाबत त्यांचे आभारही मानले आहे.
सानपाडा सेक्टर ९ मधील महापालिकेच्या भुखंड क्रंमाक ३ वरील क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था झाली होती. झाशीची राणी खेळाचे मैदान असे या क्रिडांगणाचे नाव होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था झाली असून नामफलकावरील शी, राणी, एका अक्षराचा काना ही अक्षरे गळून पडली होती. क्रिडांगणाच्या नामफकाची दुरावस्था दूर करण्यासाठी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाला अनेक लेखी निवेदनेही सादर केली. झाशीच्या राणीचे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची पालिका प्रशासनाला आठवण करून देताना थोर स्वातंत्र्यसेनानीच्या नावाने ओळखले जाणाऱ्या क्रिडांगणातील झाशीच्या राणी नामफलकाची अक्षरेच गळून पडल्याने इतिहासप्रेमींच्या संतप्त भावनाही निवेदनातून त्यांनी महापालिका प्रशासनाला जाणिव करून दिली. अखेरीला पांडुरंग आमले यांच्या पाठपुराव्याची महापालिका प्रशासनाने दखल घेत त्या क्रिडांगणावर नव्याने नामफलक लावताना तेथील दुरावस्था संपुष्ठात आणली आहे. पांडुरंग आमलेंच्या पाठपुराव्याची दखल घेताना सानपाडावासियांनी पांडुरंग आमलेंचे आभार मानले आहेत.