स्वंयम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
महाराष्ट्रातील तमाम महिला-भगिनींच्या वतीने मानले आभार….
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “महिला आरक्षण” संदर्भात घेतेलेल्या महत्वपूर्ण निर्णयाचे बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी स्वागत केले असून महाराष्ट्रातील महिला-भगिनींच्या वतीने त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण सर्व विश्वगुरु मानतो. संपूर्ण जग आज त्यांना सन्मानाने मोठ्या मनाने पाहत आहेत. देशामध्ये आज असा महायुग पुरुष झालेला नाही असे संपूर्ण देश म्हणत आहेत ते खरोखर सत्य आहे. आज अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न “महिला आरक्षण” संदर्भात जे विधेयक संसदेत पास होणार आहे. या महिला आरक्षण बिल संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न कुठलेच सरकार आणू शकले नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना होती की, या देशाची महिला सुखी, समृद्धी झाली तर हा देश प्रगती पथावर गेल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे महिला आरक्षणाचे बिल हे संसदेत पास होणार आहे. त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील महिला-भगिनींच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना तसेच खासदारांना धन्यवाद देते व आभार मानते. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये बिल आणून विधानसभेत सदर बिल पास करून महिला-भगिनींना दिलास देतील अशी अपेक्षा बाळगते व त्यांनाही धन्यवाद देते, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आभारपर निवेदनात म्हटले आहे.