ब्रास बॅण्ड महोत्सवास मनसे नेते अमित ठाकरे , आमदार राजू पाटील यांची प्रमुख उपस्थिती
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबईतील मनसेच्या वतीने भव्य स्वरूपात ‘ब्रास बॅण्ड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १६ फेब्रुवारीला हा महोत्सव बेलापूर सेक्टर १५ येथील सी.एन.जी. पेट्रोल पंपाच्या शेजारील , प्रणाम हॉटेल समोरील , प्लॉट क्रमांक १, येथील मैदानावर बेलापूर गावात रंगणार आहे.
या महोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगडसह नवी मुंबई परिसरातील सुप्रसिद्ध ब्रास बॅण्ड पथकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली आहे.
या सोहळ्याला छाया कला सर्कल ब्रास बॅण्ड (दिवाळे कोळीवाडा), श्री गणेश कला सर्कल ब्रास बॅण्ड (करावे), राष्ट्रीय ब्रास बॅण्ड (बाळकूम), श्री गणेश हनुमान ब्रास बॅण्ड कुंडेगाव (उरण), ओम साई कला सर्कल (घणसोली), झंकार ब्रास बॅण्ड (पेठ), जागृती ब्रास बॅण्ड (खारदांडा) हे बॅण्ड पथक सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत. यावेळी पंचक्रोशीतील प्रसिद्ध बॅण्ड मास्तर; तसेच संगीतकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाला मनसे नेते अमित ठाकरे यांच्या सोबतच मनसे नेते बाळा नांदगावकर , मनसेचे लोकप्रिय आमदार राजू पाटील , संदिप देशपांडे , शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सविनय म्हात्रे , सचिन कदम ,भूषण कोळी, श्याम कोळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
आगरी-कोळी समाज प्रगत झाला असला, तरीही नव्या पिढीला आपल्या पारंपरिक ब्रास बॅण्ड संस्कृतीचा विसर पडू नये या अनुषंगाने आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक संगीतमय ठेवा या शीर्षकाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य ब्रास बॅण्ड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आपली पारंपरिक वाद्य संस्कृती जपण्यासाठी आणि वृध्दींगत करण्यासाठी जास्तीत जास्त नवी मुंबईकरांनी आणि आगरी – कोळी बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन गजानन काळे यांच्या वतीने याप्रंगी करण्यात आलेले आहे.