नवी मुंबई : नेरूळ नोडमधील पर्यावरणप्रेमी मित्र मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युगांतर मित्र मंडळाकडून नेरूळ पश्चिममधील सेक्टर २४ परिसरातील बामणदेव झोटिंगदेव मैदान परिसरात रविवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.
गेल्या १२ वर्षांपासून युगांतर मित्र मंडळाकडून नेरूळ नोडमध्ये वृक्षारोपणाचे कार्य केले जात असू वृक्षारोपणाबरोबरच रोपण केलेल्या वृक्षांचे संर्वधनही या मंडळाकडून करण्यात येत आहे. आतापर्यत ५०० हून अधिक वृक्षांचे त्यांनी रोपण, जतन व संर्वधन या मंडळाकडून करण्यात आले आहे. रविवारी सकाळी वृक्षरोपण केलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी रविंद्र भगत, दर्शन म्हात्रे, श्रीकांत ठाकुर, हेमंत ठाकुर, रुणाल सुर्वे, मयूर पवार यांनी घेतली.
पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. वृक्षरोपण हे फोटोसेशन पुरता मर्यादित न ठेवता प्रत्यकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहन युगांतर मित्र मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भगत यांनी यावेळी केले.