नवी मुंबई : जुईनगर नोड, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर, सानपाडा गावात झालेल्या पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा भाजयुमोचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
जुईनगर नोड, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर, सानपाडा गावात झालेल्या पावसाळीपूर्व कामे करण्याविषयी आम्ही आयुक्त कार्यालयात निवेदने दिली होती. आयुक्त कार्यालयाकडून ती लेखी निवेदने कार्यवाहीसाठी संबंधितांना फॉरवर्डही करण्यात आली आहेत. आम्ही निवेदनामध्ये पथदिवे, झाडांची झाटणी, पदपथाची व रस्त्यांची डागडूजी, गटारांची तळापासून साफसफाई, रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्यांच्या चेम्बर्सच्या झाकणांची सुस्थिती आदी कामांचा त्यामध्ये समावेश केला होता. याशिवाय आपण आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आपले अभिनंदन करताना सानपाडा नोडमध्ये समस्यांची पाहणी करण्यासाठी अभियान राबविण्याची लेखी मागणीही केली होती. आता पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण जुईनगर नोड, सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर, सानपाडा गावात पावसाळीपूर्व कामे झाली आहेत अथवा नाही याचा आढावा घ्यावा. पावसाळ्यात कोठेही पथदिव्यांमुळे, गटारांमुळे, पदपथांमुळे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे, झाडांच्या धोकादायक फांद्या पडल्यामुळे कोठेही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.