नवी मुंबई : साई भक्त महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा व सानपाडा नोडमधील भाजपाच्या महिला नेत्या सौ. शारदाताई पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसानिमित्त साई भक्त महिला फांऊडेशनच्यावतीने रविवार, दि. ७ जुलै रोजी सानपाड्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विविध कार्यक्रमाचेही यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.
सानपाडा सेक्टर ७ व ८ मधील सिताराम मास्तर उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. त्यानंतर सानपाडा सेक्टर ७ मधील आश्रय हॉलमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० दरम्यान नवीन मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सांयकाळी ५ वाजता सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे कायद्यात झालेले नवीन बदल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सांयकाळी ६ वाजता विवेकानंद शाळेचे संकुलप्रमुख विलास वाव्हळसर विद्यार्थ्यांना व रहीवाशांना करिअरबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
सांयकाळी ७ वाजल्यानंतर शारदाताई आमले यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास बेलापुर विधानसभेच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.