या निधीतून होणार बेलापुर सेक्टर १५ मधील पुलाखाली विविध नागरी सुविधांची कामे
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईमधील बेलापूर गावातील व इतर परिसरातील नागरिक सेक्टर – १५, बेलापूर ब्रिज खाली दशविधी क्रिया करण्याकरिता येत असतात. परंतु सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुखसुविधा नसल्याने धार्मिक कार्यक्रम करण्याकरिता नागरिकांची गैरसोय होत होती. त्याच बरोबर वरिष्ठ पोलीस निरिक्षक सागरी सुरक्षा शाखा यांच्या संबंधित मागण्या व स्थानिक नागरिकांनी मागणीचे निवेदन दिले व त्या निवेदनावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, ज्या काही पोलिसांच्या व नागरिकांच्या मागण्यांवर संबधित असलेल्या सुविधा माझ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला व स्थानिक नागरिकांना देण्यात येतील असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या खाडी किनारी लगतच्या सुखसोयी योजने अंतर्गत ४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून सदर ठिकाणी विसर्जन घाट, सरंक्षण भिंत, वाहनतळ, पोचरस्ता, पाण्याची टाकी व इतर स्थापत्य कामांचा भूमिपूजन माजी विरोधीपक्ष नेता पंढरीनाथदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत स्थानिक माजी नगरसेवक दिपक पवार, माजी नगरसेवक दि. ना. पाटील, नवी मुंबई व्यापारी अध्यक्ष प्रमोद जोशी, बेलापूर राम मंदिर अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, नारायण मुकादम, शैलजा म्हात्रे, ज्योती पाटील, चंद्राजी, दिवाळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अध्यक्ष चंद्रकांत कोळी, गंगेश कोळी, खांदेवाले मच्छीमार रमेश हिंडे, ध्रुवतारा सागरी स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नरेंद्र कोंडे तसेच असंख्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.
तसेच सदरचा भूखंड हडप करण्याचा विरोधकांचा डोळा असतांना गेली १० वर्षे नागरी विकास कामात खो घालून विरोधक हे वेगवेगळ्या संस्थाना हाताशी धरून विरोध करीत होते. परंतु या विरोधकांना व त्यांच्या बोगस संस्थाना नवी मुंबईतील नागरिक आपली जागा दाखवणार आहेत असे प्रतिपादन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले.
तसेच किनारपट्टीच्या सरंक्षणाकरिता सागरी पोलीस कर्मचाऱ्यांना बोटीमध्ये ये-जा करण्याकरिता सुलभ होणार आहे व बेलापूरपट्टीतील व इतर परिसरातील ग्रामस्थांना धार्मिक कार्यक्रमकरिता जागा उपलब्धता होऊन सुख सुविधा हि निर्माण होणार आहेत.
तसेच गेली अनेक वर्षापासून सदर ठिकाणी सुख सुविधांचा अभाव असल्याने स्थानिक नारीकांना धार्मिक कार्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत होता आज त्याच नागरिकांच्या मागणीनुसार आमदार मंदाताई महत्रे यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाच्या खाडी किनारी लगतच्या सुखसोयी योजने अंतर्गत ४ कोटी रुपये निधीच्या माध्यमातून सर्व सुख सुविधा उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे.