सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- पुणे शहराला शिक्षणाचे माहेर घर म्हणत असेल तर नवी मुंबई ही “मिनी इंडिया” म्हणून ओळखली जाते तसेच नवभारताच्या व महाराष्ट्राच्या विकासाचा पाया सध्या नवी मुंबईत रचला जात आहे असे म्हणणे अतिशोक्ती ठरणार नाही. कारण नवी मुंबईत अनेक नामांकित शाळा व महाविद्यालये आहेत व नवी मुंबई महापालिकेच्या शाळादेखील उत्तम प्रकारे कार्यरत आहेत. अशातच आपल्या बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जिथे संपूर्ण जग डिजिटललायझेशन च्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्या नवी मुंबईतील शाळा ही मागे राहू नयेत या दृष्टिकोनातून आपल्या आमदार निधीतून अंदाजे रु. १ कोटी ८० लाख ८ हजार रुपये खर्च करून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील अंदाजे २० ते २५ नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत व अंदाजे १० ते १५ खाजगी शाळांमध्ये जिओ मॅट्रिकल बॉक्स व मायक्रोसॉफ्ट बॉक्स रुपी अध्ययन साहित्याचे वाटप केले आहे. तसेच इंद्रा नगर येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २५ व हनुमान नगर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक २४ येथे डिजिटल क्लास रूम व मिनी सायन सेंटरची उभारणी केली आहे. तसेच तुर्भे येथील अंजुमन इस्लाम झुबेदार तालीम प्राथमिक शाळा व नेरूळ येथील विद्याभवन शाळा येथे संगणक व प्रिंटर ची विद्यार्थ्यांना सोय करून दिली आहे ज्या प्रकारे ताईंनी रस्ते उद्यान समाज मंदिरे इतर लोकापयोगी आदींना जितके महत्त्व दिले तेवढेच नवी मुंबईतील शिक्षणाचा स्तर कसा प्रकारे उंचवता येईल व विद्यार्थ्यांना कशाप्रकारे त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक गोष्टींमध्ये योगदान व सहकार्य मिळेल व विद्यार्थी कशाप्रकारे हायटेक होतील याची त्यांना खात्री बालकली आहे त्यांनी अशा प्रकारे नवी मुंबईतील शाळांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नेमके शिक्षक विद्यार्थी पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.