सखापाटील जुन्नरकर : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी हे काही दिवसांपासून ‘सृजनांशी संवाद’ हे अभियान राबवित नवी मुंबईतील विशेषत: बेलापुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी घरटी संवाद साधत असल्याने त्यांच्या राजकीय विरोधकांच्या झोपा उडाल्या आहेत. ‘सृजनांशी संवाद’ करताना प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांशी व रहीवाशांशी संदीप नाईक चर्चा करत असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वीच त्यांचे थेट संपर्कातून सुसंवाद होत असल्याने नवी मुंबईकर सुखावल्याचे पहावयास मिळत आहे.
बेलापुर विधानसभा मतदारसंघातील एक इच्छूक उमेदवार नवी मुंबईकरांना समस्या घेवून कार्यक्रमात भेटीला या, असे सांगत असतानाच दुसरीकडे संदीप नाईक स्वत: नवी मुंबईकरांच्या दारोदारी जात समस्या जाणून घेत असल्याचा विरोधाभास नवी मुंबईकरांना पहावयास मिळत आहे, अनुभवयास मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात संदीप नाईकांना ‘नवी मुंबईचे विकासपर्व’ या नावाने संबोधले जात आहे. नवी मुंबईकरांच्या दारात जावून समस्या जाणून घेणे, त्या समस्या सोडवून नागरी सुविधांचे जाळे निर्माण करणे, ही संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीशी एक संलग्न बाब आहे. एक उच्चशिक्षित नेतृत्व राजकारणात आल्यावर स्टंटबाजी अथवा दिशाभूल तसेच चमकेशगिरी न करता थेट कॉक्रिट स्वरूपाचे विकासकार्य करते, याचा अनुभव नवी मुंबईकरांनी गेल्या २००५ पासून घेतलेला आहे व आजही अनुभवत आहे.
स्टंटबाजी करुन, चमकेशगिरी करुन, दिशाभूल करुन, इतरांवर चिखलफेक करुन जनसामान्यांमध्ये स्थान निर्माण करता येत नाही, उलट यामुळे जनतेचे मनोरंजन होऊन जनसामान्यांमध्ये आपले हसे निर्माण होते. आपले स्थान निर्माण करताना इतरांच्या अपयशाचा डांगोरा पिटणारे जनसामान्यांमध्ये कधीही अस्तित्व निर्माण करु शकत नाही. संदीप नाईकांची राजकीय वाटचाल नगरसेवक ते आमदार, संघटनात्मक पातळीवर एक विद्यार्थी नेता ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशी राहिलेली आहे.
महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात नगरसेवक म्हणून वावरताना संदीप नाईकांनी पाच वर्षे स्थायी समिती सभागृहात काम केले आहे. त्यातील शेवटची तीन वर्षे स्थायी समिती सभापती म्हणून नवी मुंबई महापालिकेत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. सुरुवातीची दोन वर्षे त्यांनी स्थायी समिती सदस्य म्हणून महापालिकेच्या कामकाजाची पद्धती, नागरी समस्या, नागरी सुविधा यांचा सांगड घालताना वापरला जाणारा निधी याचा संदीप नाईकांनी जवळून अभ्यास केला. स्थायी समितीमध्ये मंजूर केला जाणारा निधी हा नवी मुंबईच्या विकासासाठी वापरला जात असल्याने तो निधी कितपत व कशा स्वरुपात खर्च होतो. तसेच पावसाळीपूर्व कामे कशा प्रकारे होतात, याचा संदीप नाईकांनी केलेला अभ्यास आताही त्यांना जनसामान्यांना भेटी देताना उपयुक्त ठरत आहे. १९९५ ते २००७ या बारा वर्षांच्या कालावधीत स्थायी समिती सभापतींनी वातानुकूलित कार्यालयात बसून कारभार केला होता. नगरसेवक म्हणून संदीप नाईकांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा, त्यातील वापरल्या जाणाऱ्या निधीचा, विकासकामांचा, नागरी समस्या, नागरी सुविधा याचा बारकाईने अभ्यास केला. स्थायी समिती सभापती म्हणून कारभार हाकताना त्यांनी यापूर्वीच्या अन्य सभापतीप्रमाणे वातानुकूलित कार्यालयात बसून दालनात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात त्यांनी वेळ दवडला नाही. सभापतीपद हे शोभेचे नाही तर जबाबदारीचे तसेच नवी मुंबईकरांनी दाखविलेल्या विश्वासाला सार्थक करुन दाखविण्याचे पद आहे, हे संदीप नाईकांनी उक्तीने नाही तर कृतीने दाखवत नवी मुंबईच्या अन्य राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबवत संदीप नाईकांनी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभागाप्रभागात पायपीट केली. लोकांशी चर्चा केली. पालिका प्रशासन कागदावर दाखवत असलेली विकासकामे प्रत्यक्षात कशा स्वरुपात सुरु आहेत, याची त्या त्या ठिकाणी जाऊन संदीप नाईकांनी खातरजमा करुन घेतली. नवी मुंबई शहराची एकदा नव्हे तर अनेकदा पायपिट केलेले संदीप नाईक हे नवी मुंबईतील एकमेव नेतृत्व आहे. पावसाळ्यात नाला तुंबलेला असताना वाशी सेक्टर १७ मध्ये विश्वज्योती हॉटेलसमोरील नाल्यात गळ्याएवढ्या पाण्यात उतरुन संदीप नाईकांनी केलेली नालेसफाई आजही नवी मुंबईकरांच्या स्मरणात आहे. ही स्टंटबाजी नव्हती, तर पाणी तुंबलेल्या नवी मुंबईला दिलासा करण्यासाठी कृतीतून दाखविलेली आत्मियता आहे, हे त्यावेळी दिसून आले. त्याचे फोटोसेशनही संदीप नाईकांनी केले नव्हते. संदीप नाईकांच्या कार्यात कधीही नवी मुंबईकरांना स्टंटबाजी दिसत नाही, उलट दिसते ती केवळ नवी मुंबईकरांप्रती आत्मियता, जनतेने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ करण्याची धडपड. मितभाषी राहून कामाचा डोंगर उभारायला दिलेले प्राधान्य. यामुळे नवी मुंबईकरांमध्ये संदीप नाईकांची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झालेली आहे.
नगरसेवक पदावरून तसेच सभापतीपदावरुन केलेल्या कार्याची पोचपावती देताना नवी मुंबईकरांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकी बहाल केली. संपर्कातून सुसंवाद, जनतेशी थेट भेट, जनता व आपण अशी यंत्रणा राबवित त्यांनी जनता व त्यांच्यात कधीही अंतर पडणार नाही, याची काळजी घेतली. २००९ ते २०१४ यादरम्यान सभागृहात आमदार म्हणून वावरताना विधानभवनात संदीप नाईकांनी शंभर टक्के हजेरी लावली होती. जनतेने आपणास काम करण्यासाठी आमदारकी दिलेली आहे, त्या विश्वासाचे सार्थक करण्यासाठी त्यांनी अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित राहून ऐरोली मतदारसंघाच्या समस्यांकडे राज्याचे लक्ष वेधले होते. आजारी असताना, अंग तापाने फणफणत असतानाही व डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिलेला असतानाही सभागृहात विषय मांडण्यासाठी संदीप नाईकांनी अनेकदा अंगावर काढलेले आजारपण नवी मुंबईतील अनेकांनी जवळून पाहिले आहे. आमदार बनल्यावरही जनतेशी थेट संपर्काची व थेट सुसंवादाची वहिवाट संदीप नाईकांनी कायम ठेवली. ‘आमदार आपल्या दारी’ अभियानातून त्यांनी जनतेशी सुसंवाद कायम ठेवला.
२०१४ मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी लाट होती. लोकसभा निवडणूकीत देशातील मतदारांनी भाजपाला भरभरुन मतदान केले होते. एप्रिल २०१४ मध्ये लोकसभा निवडणूकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपाचे राजन विचारे विक्रमी मतांनी निवडून आले होते. त्यावेळी ‘दादा येतील, भाई पडतील’ अशी चर्चा खुद्द नाईकांच्या समर्थकांमध्ये होत होती. केवळ संदीप नाईकांच्या रणनीतीला जाणणारे व संदीप नाईकांना मानणारे त्यांचे निकटवर्तीय समर्थंकच मोदी लाटेतही संदीप नाईक सहज निवडून येणार, हे ते जाणून होते आणि छातीठोकपणे संदीप नाईक ऐरोली काढणार, असा दावा करत होते. त्यामुळे मतदान संपताच अवघ्या पाच ते दहा मिनिटातच सोशल मीडियावर अगदी व्हॉटसअप ग्रुपवरही संदीप नाईकांच्या कडवट समर्थकांनीही आम्ही जिंकलो, उद्यापासून कामे घेऊन या, असे सांगण्यास सुरुवातही केली होती. संदीप नाईक बोलतात कमी व कामे जास्त करतात. त्यांना गाजावाजा, स्टंटबाजी नाही तर काम झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेले समाधान आवडते. लोकांच्या चेहऱ्यावर जनसमस्येचे निवारण झाल्यावर जे हास्य उमटते, ते पाहून संदीप नाईक खऱ्या अर्थांने सुखावतात. हे हास्य पाहण्यासाठी संदीप नाईक दिवसभरातील अधिकाधिक वेळ जनसेवेला आजही समर्पित करत आहेत.
विधानसभा निवडणूका आता जेमतेम दीड ते पावणेदोन महिन्यावर आलेल्या आहेत. दहा-बारा दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काय केले, आम्ही काय केले अशा स्वरूपाची बालिश स्टंटबाजी न करता संदीप नाईकांनी ‘सृजनांशी संवाद’ अभियान राबविताना बेलापुर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ते प्रभागाप्रभागात फिरत आहेत. त्यांच्या कार्याची बरोबरी न करु शकणारे संदीप नाईकांवर टीका करणारे जनसामान्यांमध्ये स्वत:चे हसे करून घेत आहेत. प्रभागाप्रभागात फिरताना संदीप नाईक स्वत: नागरिकांशी संवाद साधत आहेत, भेटीगाठी घेत आहेत. लोकांना काय हवे आहे, ते जाणून घेत आहेत. संदीप नाईक भेटीला आल्याने जनता सुखावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संदीप नाईक कोणावरही टीका करत नाहीत. त्यांना स्वत:च्या बलस्थानांची व मर्यादांचीही जाणीव आहे. त्यामुळे थंड डोक्याने त्यांची वाटचाल सुरु आहे. प्रभागाप्रभागात त्यांच्या भेटी वाढल्याने राजकीय विरोधकांचा जळफळाट वाढीस लागला आहे. ते कोणत्याही निवडणूकीत पराभूत झाले नाही. स्टंटबाजी करुन , दिशाभूल करुन प्रसिद्धी मिळविण्याचा ते कधीही प्रयत्न करत नसल्याने ‘बंदे मे है दम’ असा सूर बेलापुर विधानसभा मतदारसंघातील जनता आता आळवू लागली आहे. संदीप नाईक आता समस्या जाणून घेत आहेत, त्यांच्या नगरसेवकांनी काय केले, असा बालिश प्रश्न संदीप नाईकांचे विरोधक उपस्थित करत आहे. परंतु जनताच त्यांच्या बालीश प्रश्नाला सभागृह बरखास्त होऊन आता साडेचार वर्ष लोटली असल्याचे उत्तर देत आहेत. कोव्हिड काळात प्रभागाप्रभागातील जनतेला नवी मुंबईकरांना कोट्यवधी रुपयांचे धान्य माजी नगरसेवक व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वितरीत करुन, मास्क-भाजीचे वाटप करुन, सॅनिटायझेशन, उपचारासाठी रुग्णालयीन उपलब्धता, आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुन संदीप नाईकांनी केलेल्या कामाचा कधीही गाजावाजा केला नाही. आपण ज्याची कामे केली आहेत, ते जाणून आहेत. त्यामुळे प्रसिद्धी हवी कशाला, आपण आपले कर्तव्य केले, जनतेच्या विश्वासाला तडा जावू न देण्याचे काम केले. नवी मुंबई शहर हे आपले घर आहे. स्वत:च्या घरासाठी राबल्यावर श्रेय कशाला हवे, असे संदीप नाईक हे वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पटवून देत असतात. मतदार सुज्ञ आहेत. आपल्यासाठी कोण राबत आहे, कोण सतत आपल्या भेटीला येत आहे. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे, आयुक्तांच्या सतत भेटी घेत आहे, प्रभागाप्रभागातील समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला भाग पाडत आहे, हे नवी मुंबईकर जवळून पाहत आहे. थेट सुसंवाद व गाजावाजा न करता, स्टंटबाजी न करता केली जाणारी कामे ही संदीप नाईकांची बलस्थाने आहेत. संपर्कातून सुसंवाद पुन्हा एकवार करताना संदीप नाईकांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु केल्याने बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संदीप नाईकांनी बेलापुर मतदारसंघातील जनतेच्या थेट गाठीभेटीचे प्रमाण वाढल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.