विरोधी पक्षांना हलक्यात न घेण्याचे महाविकास आ्घाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी दिल्या सूचना
श्रीकांत पिंगळे : Navimumbalilivwe.com@gmail.com
नवी मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने नेरुळ सेक्टर १४ परिसरातील कुकशेत गावातील अभिनंदन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये नेरूळ पश्चिम परिसरातून उमेदवार संदीप नाईक यांना सर्वांधिक लीड देण्याची ग्वाही संदीप नाईकांना देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या संदीप नाईकांनी समोर उभ्या असलेल्या कोणत्याही उमेदवाराला हलक्यात न घेण्याच्या सूचना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना, माजी नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना दिल्या. सोमवारी सांयकाळी झालेल्या या महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीमध्ये सर्वांधिक कार्यकर्ते हे उबाठा शिवसेनेचे उपस्थित असल्याचे प्रकर्षांने पहावयास मिळाले.
बैठकीमध्ये नवी मुंबईेचे माजी महापौर जे.डी.सुतार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुरज पाटील, गिरीश म्हात्रे, स्नेहा पालकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे, सुनिता मांडवे, रंगनाथ औैैटी, विशाल ससाणे, काशिनाथ पवार, सतीशदादा रामाणे, कॉंग्रेसचे नवनाथ चव्हाण, तुकाराम कदम, जीवन गव्हाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील सुतार, चंद्रकांत चिकणे, अनिल लोखंडे, गणेश रसाळ, देवनाथ म्हात्रे, चंद्रशेखर भोपी, रवी भगत, अक्षय पाटील, हरिश भोईर, प्रशांत सोळसकर, शिवसेनेचे शिवाजी महाडीक निखिल मांडवे, प्रल्हाद पाटील, अरविंद जाधव, सस्मित भोईर, विजय तांडेल, शरद पाजंरी यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
या आढावा बैठकीत माजी नगरसेवक सुरज पाटील, कॉंग्रेसचे नवनाथ चव्हाण, तुकाराम कदम यांनी भाषणातून कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारासाठी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना उबाठा गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी महायुतीवर तसेच स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्या कारभाराचा पंचनामा करताना संदीप नाईकांना बहूमताने विजयी करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी निवडणूक लढविण्यामागची पार्श्वभूमी विषद करताना बेलापुर मतदारसंघाच्या विकासाची संकल्पना विषद केली. प्रतिकूल परिस्थितीमध्येही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा संदीप नाईक यांनी यावेळी केली.
आढावा बैठकीला लाभलेली गर्दी पाहता पहिला मजला खचाखच भरला होता, तळमजल्यावर तसेच रस्त्यावरही उपस्थितांची गर्दी होती. बैठक संपल्यावर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उमेदवार संदीप नाईकांसमवेत फोटो काढण्यासाठी झालेली गर्दी पाहता सर्वांमध्येच संदीप नाईकांप्रती असलेली जवळीक पहावयास मिळाली. नेरूळ पश्चिममधून अन्य उमेदवारांच्या तुलनेत संदीप नाईक प्रचंड आघाडी घेणार असल्याची चिन्हे आढावा बैठकीतील घडामोडीवरुन पहावयास मिळाली.