नवी मुंबई : १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष “महायुतीच्या” अधिकृत उमेदवार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचार्थ बेलापूर मंडळ मधून झालेल्या प्रचार रॅलीला जनतेचा जोशपूर्ण प्रतिसाद लाभला. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांचे नवी मुंबईमध्ये झालेल्या विकास कार्यावर असलेला जनतेचा अतूट विश्वास आणि समर्थनाचे प्रतिक ठरले. नवी मुंबईमध्ये सामाजिक बांधिलकी जपत अहो दिवस-रात्र काम करण्याऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने झंजावती प्रचार दौरा सुरु झाला. त्यानुसार बेलापूर मंडळसह सीवूड्स मध्ये हि प्रचार रॅली पार पडली. सदर प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांना १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा बहुमतांनी विजय करण्यसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी “कमळ” निशाणी समोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.
सदर प्रचार रॅलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजितदादा पवार) गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, कॉग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी, संतोष पळसकर, दत्ता घंगाळे, जयवंत तांडेल, स्मिता पाटील, पुण्यनाथ तांडेल, भरत जाधव, आरती राउळ, देविका करपे, दामोदर पिल्ले, ज्योती पाटील, सुधीर पाटील, कुंदन म्हात्रे, सुजित कोळी, कैलास कोळी, ज्ञानेश्वर कोळी यांच्या सह मंडळ प्रमुख आणि पदाधिकारी तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.