नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील ओपन जीममधील नादुरस्त साहित्याची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये वरुणा, सीव्ह्यू, सागरदिप या तीन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मध्यभागी राजमाता जिजाऊ उद्यान व तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यानात पालिका प्रशासनाने ओपन जीम बनविलेली आहे. आजूबाजूला असणाऱ्या महागड्या व्यायामशाळेत जावून व्यायाम करणे खर्चिक असून व ते सेक्टर सहामधील अत्यल्प, अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांच्या खिशाला परवडत नसल्याने ते ओपन जीममध्ये व्यायाम करत असतात. या ओपन जीमचे विशेष म्हणजे विभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला येथे मोठ्या संख्येने व्यायाम करताना पहावयास मिळतात. या ओपन जीममधील पायाने चालण्याचा व्यायाम करण्याचे साहित्य (पाय पुढे-मागे करण्याचा वॉकर) बिघडले आहे. पाय पुढे मागे करताना एका पायाचे साहित्य तुटले असून ते लोखंडावर आदळत आहे. त्यामुळे स्थानिक रहीवाशांना या साहित्याचा वापर करता येत नाही. आपण समस्येचे गांभीर्य व स्थानिकांच्या व्यायामाची गरज पाहता संबंधितांना ओपन जीममधील हे नादुरुस्त साहित्य तातडीने दुरुस्त करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.