श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये भाजपा आमदार व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचाराची जोरदार आघाडी उघडल्याचे दिसत आहे. भाजपामधील आमदार मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय समर्थक पांडुरंग आमले, सौ. शारदाताई आमले यांच्या भाजपा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सानपाडा नोड पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
बेलापूर विधानसभा १५१.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सौ मंदाताई विजय म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंजावात सानपाडा संपूर्ण सेक्टर १० या परिसरात झाला.. या प्रचार फेरीत सानपाड्यातील समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले व शारदा पांडुरंग आमले, रमेश शेटे, नाना शिंदे, विश्वास कणसे, सुधीर आंग्रे,आत्माराम कुलवडे, वसंत बावकर, अविनाश टेमकर, अशोक ढसाळ, प्रतिभाताई पवार, संचिताताई जॉईल, नीताताई आंग्रे, सुचिता ताई शेटे, मंगल ताई वाव्हळ, त्याचबरोबर त्यांचे असंख्य सहकारी आणि महिला भगिनी, तसेच शिवसेनेतील पदाधिकारी विसाजी लोके, अजित सावंत ,गणेश पावगे, सूर्यकांत झेंडे, हेमंत जाधव, संजय कदम, अविनाश जाधव, साहिल सोरटे, शिरीष पाटील, मनोज भोईर, विनय कुमार शर्मा, वर्षा जाधव, प्रियांका जाधव, शुभम भालेराव, नवनाथ मेंगडे.. यांची उपस्थिती होती.