श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे नवी मुंबई शहर प्रमुख नविन प्रतापे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. विजय नाहटा यांच्यासारखा उच्चशिक्षित उमेदवार आपल्या बेलापूर विधानसभेला लाभावा आणि विधानसभा क्षेत्राचा विकास साधता यावा या हेतूने मी माझा स्वतःचा भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून असून माझ्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ. सुरेश माने यांच्या सल्ल्याने आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन विजय नाहटा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुढील काळात अगदी उघडपणे विजय नाहटा यांच्या प्रचारात पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊन प्रचार करणार असल्याचे प्रतापे यांनी सांगितले आहे.