नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात असून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निधीमधून बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली २० वर्षे ‘विकास कामांची गंगा’ सुरूच आहे. आमदार निधी मधून ६ लाख रुपये खर्च करून वाशी-कोपरखैरणे रोड, सेक्टर – १० येथे ‘बस स्टॉप’चा लोकार्पण ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष गुणाजी कोकाटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, बेलापूर मतदारसंघातील शाळा, महाविद्यालयासमोरील बस स्टॉप व जीर्ण झालेले बस स्टॉप असतील ते हटवून सदर ठिकाणी आमदार निधीमधून उत्तम दर्जाचे बस स्टॉप उभारण्यात येतील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.