सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेचा सन २०२५-२६चा अर्थसंकल्प तयार होत असून माजी आमदार संदीप नाईक यांनी या अर्थसंकल्पात नागरी सोयी-सुविधा, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, पायाभूत सुविधा, परिवहन, आर्थिक शिस्त दी विषयांवर मौल्यवान सूचना केल्या आहेत. या मागण्यांचे लेखी निवेदन महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांना देण्यात आले आहे.
महापालिकेत लोकप्रतिनिधी सभागृह अस्तित्वात नसल्याने लोकप्रतिनिधींचा अंदाज पत्रकात थेट सहभाग नाही. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब अंदाज पत्रकात दिसले पाहिजे. गेल्या २५ वर्षांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढ न करता नागरिकांना दिलासा दिला आहे. याच धोरणाचा पुढील पाच वर्षांसाठीही अवलंब करून यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढ करू नये अशी आग्रहाची मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. त्याचबरोबर ५०० चौरस मीटरच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ करावा. ५०१ ते ७०० चौरस मीटरच्या घरांना ६०% करसवलत मिळावी, अशी महत्वाची मागणी देखील त्यांनी केली आहे. महत्वाच्या योजणांसाठी निधीची तरतूद करण्याबरोबरच नागरिकांच्या मागणी नुसार प्रभागनिहाय नागरी सुविधा कामांचा सविस्तर मागणी अहवाल पालिका आयुक्त शिंदे यांच्याकडे सादर केला आहे.
पायाभूत सुविधा, भिरा हायड्रो प्रोजेक्टवरून १००० एमएलडी पाणी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. नाला व्हिजन अंतर्गत जलनिचरण व्यवस्थेसाठी विशेष निधी द्यावा. शहरातील प्रमुख मार्गांवर नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास तयार करावेत. मुकुंद कंपनीसमोर अंडरपास रबाळे तलावाजवळ उड्डाणपूल पामबीच रोडवरील विविध चौकांवर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ऐरोली, बेलापूर, वाशी, तुर्भे या ठिकाणी नवीन स्कायवॉक कोस्टल रोड: बेलापूर-वाशी-ऐरोली-दिघा जोडणारा मार्ग जलवाहतुकीस चालना देण्यासाठी नवीन जेट्टींची उभारणी. आरोग्य व वैद्यकीय सुविधा.. महापे, तुर्भे, दिघा, घणसोली येथे सार्वजनिक रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे व माता-बाल रुग्णालयांची उभारणी. नागरिकांसाठी मेडिकल इन्शुरन्स योजना. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक कॅथलॅब सुरु करणे. सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड योजना राबविणे. शिक्षण आणि युवक विकास… महानगरपालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्यासाठी विशेष निधीची तरतूद. क्वालिटी एज्युकेशन कार्यक्रमासाठी निधी. अबॅकस शिक्षण सुरू करणे. विद्यार्थी वंचित राहू नयेत म्हणून गणवेश, पुस्तके, टॅब आणि आरोग्य सुविधा पुरवणे. मैदाने, युवक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी निधी. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर स्टेडियम (ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे येथे). सार्वजनिक वाचनालये, ई-लायब्ररी, करिअर मार्गदर्शन केंद्रांची स्थापना. नर्सिंग आणि पॅरामेडिकल कॉलेजची निर्मिती. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे. पर्यावरण व पर्यटन विकास.. बटरफ्लाय गार्डन, फ्लेमिंगो सफारी, गवळीदेव-सुलाईदेवी पर्यटनस्थळे विकसित करणे. पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर उभारणी. एस.टी.पी. पाणी पुनर्वापर प्रणाली विकसित करणे. तलाव आणि होल्डिंग पाँड्सची स्वच्छता व सुशोभीकरण. नवी मुंबई प्रवेशद्वाराची उभारणी. मत्स्यालयाची निर्मिती. सायकल ट्रॅक आणि हरित पट्ट्यांच्या निर्मितीसाठी विशेष तरतूद करणे. सामाजिक व कल्याणकारी योजना.. महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना आणि उद्योग केंद्रांची स्थापना. असंघटित नाका कामगारांसाठी शेल्टर उभारणी. बेघरांसाठी रात्र निवारा केंद्र स्थापन करणे. झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी रात्र शाळा सुरू करणे. महिला बचत गट उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी केंद्रे स्थापन करणे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारणी. धार्मिक व सांस्कृतिक भवनांची उभारणी (धर्मवीर संभाजी महाराज भवन, बसवेश्वर महाराज भवन, संत सेवालाल भवन, गुरुगोविंद भवन, आगरी-कोळी भवन, वारकरी भवन). महिलांसाठी पाळणाघर सुविधा निर्माण करणे. दिव्यांगांसाठी विशेष अनुदान आणि सुविधा उभारणी. वाहतूक व सार्वजनिक सेवासुविधा… इलेक्ट्रीक बस आणि हायड्रोजन फ्यूल बससाठी विशेष निधीची तरतूद. ट्रान्झिट कॅम्पच्या निर्मितीसाठी सिडकोकडून भूखंड हस्तांतरण करून उभारणी करणे. महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना कचरा व्यवस्थापनासाठी कचरा पेट्या पुरवणे. वाशी डेपोच्या धर्तीवर इतर वाहतूक डेपो विकसित करणे. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल आणि वाहनतळ व्यवस्था सुधारण्याची तरतूद. वित्तीय नियोजन व अर्थसंकल्पीय शिस्त…. शहराची क्रेडिट रेटिंग AA+ असल्याने मोठ्या प्रकल्पांसाठी ‘डिफर पेमेंट’ आणि बाँड्सद्वारे निधी उभारण्याचा विचार करावा, जेणेकरून भविष्यातील अर्थसंकल्पांवर भार पडणार नाही. महापालिकेच्या महसूल वाढीसाठी नवीन स्रोत शोधणे.