सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर संत सेवालाल महाराज यांनी समाजाला सेवाभाव आणि भक्तीचा मार्ग शिकवला. योग्य दिशा दाखवत समाजात जनजागृती केली. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सेवालाल महाराज बंजारा सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध ठिकाणी हजेरी लावून थोर संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, सीबीडी से – ८ सीबीडी बेलापूर येथील जगदंबा मातेच्या मंदिरात हा उत्सव उत्साहात पार पडला. जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये बंजारा बांधवांसाठी होम पूजन, भजन, जागरण, तसेच भव्य मिरवणूक व भक्तांसाठी महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले. थोर संत सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सवात सहभागी झाल्यामुळे बंजारा समाजानी आनंद व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा ही संत सेवालाल महाराज यांच्या प्रेरणेतून बंजारा समाजाचा गौरवशाली वारसा जपण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, असे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बंजारा बांधवांना दिले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत जयसिंग पवार, नम्रता पवार, विजय पवार, किशन राठोड, अनिल राठोड, पिंटू अण्णा तसेच महाराज बंजारा सेवा ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बंजारा बांधव उपस्थित होते.