नवी मुंबई : सिडकोसह व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत नवी मुंबईत उद्भवणाऱ्या समस्यांबाबत गुरुवारी बैठक पार पडली. बैठकीमध्ये नवोदित प्रकल्पा संदर्भात आढावा घेतला. यामध्ये नवी मुंबई शहरातील बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, वाशी येथील समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली.
नवी मुंबईतील धार्मिक स्थळांचे भूखंड स्थळांच्या दराप्रमाणे संस्थेच्या नावावर करणे, महिला बाल भवनाची उर्वरित राहिलेली प्रक्रिया पूर्ण करणे, समाज मंदिरांसाठी भूखंड उपलब्ध करून देणे,धार्मिक स्थळांसाठी भूखंड आरक्षित ठेवणे, मासळी मार्केटकरिता भूखंड उपलब्ध करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देणे, अशा विविध समस्यांचा पाढा बैठकीत वाचून दाखवला. या सर्व प्रश्नांवरती सिडकोसह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सकारात्मकता दाखवत नवी मुंबईच्या उज्वल भवितव्यासाठी योग्य निर्णय घेऊन सदर प्रश्नांचे लवकरात लवकर निरसन केले जाईल, असे आश्वासन यावेळेस दिले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासमवेत माजी नगरसेवक दीपक पवार, विकास सोरटे, मनोहर बाविस्कर, कमळ शर्मा, बलवीरसिंग चौधरी, अशोक नाईक, जयवंत तांडेल, विजय नाईक, जयराम पासवान, महेंद्र नाईक, गणेश पाटील, शरद पाटील, अनंता नाईक, भागेश भोईर, भावेश नाईक, प्रवीण पाटील, रमेश नाईक, तसेच प्रजापती मंदिर, सरस्वती धाम मंदिर, दुर्गा माता मंदिर, सेवालाल मंदिर, राम मंदिर व इतर मंदिराचे विश्वस्त व सदस्य उपस्थित होते.