अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील राजमाता जिजाऊ उद्यानातील झोपाळ्याखालील खड्डे तातडीने बुजविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाकडून मुलांसाठी झोपाळे बसविले आहेत. परंतु या झोपाळ्यांखाली मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे मुलांना झोपाळ्यांवर खेळणे शक्य होत नाही. याशिवाय या खड्ड्यात पाणी साचल्याने डेंग्यूचा उद्रेक होवून उद्यानात येणाऱ्यांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागंण्याची भीती आहे. संबंधितांना खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



