जुन्नर (प्रतिनिधी): ग्राहक कल्याण फाऊंडेशन जुन्नर तालुका यांच्यावतीने आर्वी केंद्र येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष के. डी. अण्णा सरोदे व कार्याध्यक्ष वंदना वाकचौरे व महिला तालुकाप्रमुख वैजयंती कोराळे, जमीन शेख, जयेश खांडगेपाटील, रवींद्र कोल्हे, प्रसारप्रमुख पल्लवी सरोदे व निलेश रसाळ हे सर्व ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमाने केली जाते. त्याचप्रमाणे ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे त्यांच्या तक्रारी देखील निवारण केल्या जातात. भविष्यात देखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या माध्यमातून समाजाची बांधिलकी जोपासण्यासाठी तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळेत देखील शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे अध्यक्ष के. डी अण्णा सरोदे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी केंद्र या शाळेचे शिक्षक साईनाथ कानिग्न ध्वज यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका भरती अल्हाड यांनी मानले.



