अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ आणि जुईनगर नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नेरुळ सेक्टर २ आणि ४ तसेच जु्ईनगर नोडमधील अंर्तगत व बाह्य वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनांतील प्रवाशांना येथून ये-जा करताना त्रास होत आहे. याशिवाय वाहन खड्ड्यातून गेल्यावर पदपथावरुन ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर पाणी उडून त्यांचे कपडे खराब होत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यामुळे व परिसरालाही बकालपणा आला आहे. खड्ड्यातून ये-जा करताना दुचाकी वाहनांचा अपघात होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.



