• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2025

पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा ‘ काय भाऊ’  म्हणून संबोधताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुखावले…!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा ‘ काय भाऊ’  म्हणून संबोधताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुखावले…!

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत पुन्हा एकदा ‘काय भाऊ’ म्हणून उल्लेख केल्याने  डॉक्टर शिंदे यांना सुखद धक्का बसला आहे. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या परदेशी पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा समावेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांत यांचा उल्लेख भाऊ असा केला होता त्यावेळी देखील श्रीकांत शिंदे यांना त्याचे कौतुक वाटले होते.

दिल्लीमध्ये जी.एम. सी बालयोगी सभागृहात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची संयुक्त बैठक उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप आणि भाजपचे सर्व लोकशाही आघाडी मधील मित्रपक्ष यांचे खासदार उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शिवसेनेच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रताप  जाधव यांनी सत्कार केला. त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या खुर्चीवरून उठल्यावर त्यांच्या दिशेने जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा ‘काय भाऊ’ अशी हाक मारली. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील स्मितहास्य करत पंतप्रधानांनी संबोधलेल्या भाऊ उपाधीला मनापासून दाद दिली. श्रीकांत शिंदे यांना पंतप्रधानांनी  दुसऱ्यांदा भाऊ संबोधल्याची चर्चा त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांमध्ये सुरू होती.

शिवसेनेचे खासदार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबत दिल्लीतील राजकीय वर्तुळात आकर्षण आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून ते सलग तीन टर्म मोठ्या मताधिक्याने शिवसेना-भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे खासदार म्हणून निवडून येत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून देत या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा सर्वंकष प्रयत्न खासदार श्रीकांत शिंदे हे सातत्याने करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माहितीसाठी परदेशी पाठवलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. खासदार शिंदे यांनी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देत भारत सरकारची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अत्यंत प्रभावीपणे आणि जोरदारपणे मांडण्याचे काम केले. त्यावेळी देखील त्यांच्या या धडाकेबाज कामाची पोचपावती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा खासदार श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. तेव्हापासून श्रीकांत शिंदे हे शिवसेना भाजप तसेच महायुतीच्या वर्तुळात भाऊ या नावानेच अधिक संबोधले जाऊ लागले आहेत.

Previous Post

विघ्नहर साखर कारखान्याची वार्षिक सभा उत्साहात

Next Post

ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘ड्राय डे’साठी एमआयएम आग्रही

Next Post
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

ईद-ए-मिलादच्या दिवशी ‘ड्राय डे’साठी एमआयएम आग्रही

घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

घरगुती गणेशोत्सवचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर धडकण्याचा मनसेचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com