मुंबई : हाजी शहानवाज खान फाउंडेशन यांच्यावतीने पर्यावरणपूरक (इंको फ्रेडली) घरगुती गौरी गणपती आरास व सजावट स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सहभागी होता येईल.
मुंबई शहर, उपनगर, पालघर , ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम, द्वितीय, तृतीत व उत्तेजनार्थ तीन बक्षिसे असून जिल्हानिहाय प्रथम व द्वितीय अशी वेगळी बक्षिसे देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांना Haji shahnawaz Khan या इंस्टाग्राम आयडीवर सजावटीचे फोटो तसेच व्हिडीओ टॅग करावा अथवा ९९८७५७३५५२, ७७१००८६७८६ या व्हॉटस क्रमाकांवर पाठवावेत, असे आवाहन हाजी शहानवाज खान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.



