• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 8, 2025

तानाजी मालुसरे क्रिडांगणाचा बकालपणा घालविण्याची राष्ट्रवादीची (शपग) मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तानाजी मालुसरे क्रिडांगणाचा बकालपणा घालविण्याची राष्ट्रवादीची (शपग) मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील समस्या सोडवून बकालपणा घालविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून दिली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या मैदानावर बाराही महिने आपणास बकालपणा पहावयास मिळतो. विशेष म्हणजे या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी, बकालपणा घालविण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काहीही प्रयत्न झालेले नाहीत. स्थानिक रहिवाशांसाठी हे एकमेव मैदान आहे. मैदानात डागडूजी झाली नसल्याने ओबडधोबड भाग, खाचखळगे, कुठे पेव्हर ब्लॉक पडलेले, कुठे मोठ्या दगडी विखुरलेल्या पहावयास मिळतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा बाराही महिने जंगली गवत या मैदानात असतेच. पावसाळा संपल्यावरही जंगली गवत काढले जात नाही. याबाबत कोणी प्रशासनाकडे काही बोलत नाही आणि प्रशासन माहिती असूनही समस्या सोडवत नाही. मैदानाच्या एका बाजूला एव्हरग्रीन सोसायटीकडे जाताना छोटेखानी लोखंडी प्रवेशद्वार होते. ते तुटल्याने नवीन न बसविता अथवा जुन्या प्रवेशद्वाराची डागडूजी न करता तेथे प्लायवूड टाकण्यात आले आहे. आहे तो भाग आणखी काही बकाल कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मैदानात असलेल्या गटारावरती झाकण असणारे सिमेंटचे ठोकळे निघाले आहेत. त्या खुल्या भागातून गटारामध्ये कचरा साठला आहे. यामुळे मैदान व उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानात उंदरांचा सुळसुळाट झाला असून क्रिडागंणाच्या सभोवताली उंदरांनी केलेली अनेक बिळे पहावयास मिळतात. यापूर्वीही या विषयावर आपणास निवेदने दिलेली आहेत. तथापि मैदानातील  समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने स्थानिक लोकांसमवेत पालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात जावून आंदोलन करावे लागेल. संबंधितांना या मैदानातील समस्यांचे निवारण करण्याचे, बकालपणा घालविण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.

Previous Post

सानपाडा सेक्टर १० मधील सेन्सरी (संवेदना) उद्यानातील असुविधांमुळे रहिवाशांचा उद्रेक

Next Post

जुईनगर सेक्टर २३ मधील जुई गावातील नाल्यावरील, गटारावरील तुटलेल्या झाकणांच्या जागी नवीन झाकणे बसवा : कॉंग्रेसची मागणी 

Next Post
जुईनगर सेक्टर २३ मधील जुई गावातील नाल्यावरील, गटारावरील तुटलेल्या झाकणांच्या जागी नवीन झाकणे बसवा : कॉंग्रेसची मागणी 

जुईनगर सेक्टर २३ मधील जुई गावातील नाल्यावरील, गटारावरील तुटलेल्या झाकणांच्या जागी नवीन झाकणे बसवा : कॉंग्रेसची मागणी 

बेकरीच्या जीवघेण्या धुरापासून मुक्तता करण्याचे सानपाडावासियांचे रविंद्र सावंत यांना साकडे

बेकरीच्या जीवघेण्या धुरापासून मुक्तता करण्याचे सानपाडावासियांचे रविंद्र सावंत यांना साकडे

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com