• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 28, 2025

सलग चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांकडून लंकादहन

adminbyadmin
in देश - विदेश
0
सलग चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांकडून लंकादहन

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या ५ टी –२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना तिरुवनंतपुरममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने धावांचा बचाव करताना ३० धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने दमदार सुरुवात केली. पण शेवटी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघाने विजयाचा चौकार मारत मालिकेत ४–० ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर २२१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्माने १६२ धावांची विक्रमी भागीदारी केली. शफाली वर्माने ७९ धावा केल्या. तर स्मृती मानधनाने ८० धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर ऋचा घोषने नाबाद ४० धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद १६ धावा केल्या. यासह भारतीय संघाने २ गडी बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून हसिनी परेराने ३३ धावांची खेळी केली. तर चमिरा अटापटूने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. हर्शिथा समरविक्रमाने २० धावांची खेळी केली. तर कविशा दिलहारीने १३ धावांची खेळी केली. निलक्षी डी सिल्वा २३ धावांवर नाबाद राहिली तर कौशिनीने ५ धावांची खेळी केली. श्रीलंकेला ६ गडी बाद १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. पण श्रीलंकेचा संघ विजयापासून ३० धावा दूर राहिला.

 

स्मृती मानधनाच्या १० हजार धावा पूर्ण

या सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठणारी फलंदाज ठरली आहे. याआधी मिताली राजने १० हजार धावांचा पल्ला गाठला होता. स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठणारी चौथी फलंदाज ठरली आहे.

ind vs sl

Previous Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार शिवसेनेत!

Next Post

निवडणुक प्रक्रियेसाठी सहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना १ ते ७ जानेवारीदरम्यान प्रशिक्षण

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

निवडणुक प्रक्रियेसाठी सहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना १ ते ७ जानेवारीदरम्यान प्रशिक्षण

मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

संदीप नाईकांच्या व्यूहरचनेकडे विरोधी पक्षांच्या नजरा खिळल्या !

शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार महादेव पवार यांचा लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार महादेव पवार यांचा लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com