• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2026

तिकिटवाटपात आमदार मंदाताईंना मिळालेल्या वागणुकीमुळे नवी मुंबईमधील देवाभाऊच्या लाडक्या बहीणींमध्ये नाराजी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेऊन शहर विकासाला हातभार लावा : राजेश नार्वेकर

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या विक्रमी यशामध्ये राज्यातील महिलांचा वाटा निर्णायक ठरला आहे. निवडणुकीअगोदर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु करुन महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मदत करुन महिला वर्गाचा जनाधार पूर्णपणे महायुतीकडे वळाला. तथापि भाजपच्या बेलापुरच्या महिला आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना तिकिट वाटपात डावलले गेल्याने जे भाजपातील लाडक्या बहीणींना न्याय देवू शकत नाही, ते राज्यातील अन्य लाडक्या बहीणींना काय न्याय देणार, असा संतप्त सूर नवी मुंबईतील महिला वर्गाकडून आळविण्यात येत आहे. तिकिट वाटपात मंदाताई म्हात्रेंना विश्वासात न घेणे, त्यांच्या समर्थकांना एकही तिकिट न देणे, १३ कोरे एबी फॉर्म देवून त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांची झालेली फसवणूक यामुळे नवी मुंबईतील सुशिक्षित वर्गात, विशेषत: महिला वर्गांमध्ये, युवतीमध्ये भाजपाप्रती संतापाची व नाराजीची लाट निर्माण झाली असून भाजपला पालिका निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंदाताई म्हात्रे २०१४ पासून भाजपत कार्यरत असून सलग तीन वेळा बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मंदाताई म्हात्रे हे नेतृत्व स्वबळावर नावारुपाला आले असल्याचा अभिमान नवी मुंबईतील महिलांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. सलग तीन वेळा निवडून आलेल्या महिला आमदाराला तिकिट वाटपात मिळालेली वागणूक नवी मुंबईतील सुशिक्षित महिला वर्गात, युवतींमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. महिला आमदाराला १३ एबी फॉर्म कोरे देवून त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना झुलवत ठेवण्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. महिला आमदाराला कोणत्याही निवड प्रक्रियेत विश्वासात घेण्यात आले नाही. ज्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले, त्या कार्यकर्त्यांना तिकिट वाटपात डावलून ज्यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी बेलापुर विधानसभा मतदारसंघात परिश्रम घेतले, त्यांनाच तिकिट देण्यात आले आहे. मोदी-शहा-फडणवीसांना हीच भाजप बेलापुर मतदारसंघात घडवायची आहे. विरोधात काम करणाऱ्यांना न्याय मिळत असेल तर भाजपसाठी काम करुन फायदा काय, असा संतप्त सुर भाजपच्या वर्तुळात आळविला जात आहे.

मंदाताईंना तिकिट वाटपात काहीही स्थान न मिळणे, १३ कोरे एबी फॉर्म देवून झुलवत ठेवणे, एकाच घरात दोन दोन, तीन तीन तिकिट देणे या प्रकारामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराना फायदा होण्याची शक्यता प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झाली आहे. केवळ पैसे देवून महिलांना लाडकी बहीण संबोधणे व घरातील आमदार असलेल्या बहीणीचा तिकिट वाटपात अपमान करणे हा भाजपचा नव्याने निर्माण झालेला चेहरा नवी मुंबईकरांच्या पचनी पडलेला नाही. आमदार मंदाताईंना मानणारा एक ठराविक टक्का नवी मुंबईत आहे, ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बेलापुर मतदारसंघात डावलण्यात आले, तेही कोठे उघडपणे तर कोठे छुप्पेपणाने भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे. ज्या लाडक्या बहीणींचे एकगठ्ठा मतदान विधानसभेला झाले, त्या एकगठ्ठा मतदानातील मोठा टक्का शिंदेच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून स्वबळावर सत्ता आणण्याच्या भाजपाच्या संकल्पनेला भाजपातूनच अडथळे निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. देवाभाऊ सातत्याने लाडक्या बहीणींचा सार्वजनिक कार्यक्रमातून उदोउदो करत असतात, तेच देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहीण असलेल्या मंदाताईंना तिकिट वाटपात मिळालेली वागणूक यावर काय भूमिका घेतात, याकडे ठाणे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागून राहीले आहे.

Previous Post

सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

Next Post

प्रभाग २३ मध्ये भाजप-शिवसेनेत कॉंटे की टक्कर

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

प्रभाग २३ मध्ये भाजप-शिवसेनेत कॉंटे की टक्कर

सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाडा प्रभाग १९ मध्ये अपक्षांच्या मुसंडीने समीकरणात उलथापालथ

सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाडा प्रभाग १९ मधील हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com