• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 2, 2026

प्रभाग २३ मध्ये भाजप-शिवसेनेत कॉंटे की टक्कर

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

नवी मुंबई : तब्बल साडे दहा वर्षांनी होत असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेसाठी खऱ्या अर्थांने शिवसेना-भाजपतच खरी लढाई होत आहे. तिकिटवाटपामध्ये आमदार मंदा म्हात्रे गटाला डावलत गणेश नाईक गटाने एकहाती वर्चस्व मिळविले असले तरी सत्ता मिळविण्यासाठी व महापौर बसविण्यासाठी नाईक गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना शिंदे गट नवी मुंबईत कमालीचा प्रभावी असून त्यातच नाराजांचा गट, आमदार मंदाताई म्हात्रेंचे तिकिट वाटपात डावलले गेलेले रथी-महारथी यामुळे भाजपची सत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल खडतर बनली आहे. नेरूळ नोडमधील प्रभाग २३ मध्ये शिवसेना-भाजपमध्येच कॉंटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.

प्रभाग २३ मधून शिवसेनेच्या वतीने महिला राखीव गटातून माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, खुल्या गटातून उच्चशिक्षित सौ. आश्विनी मते-म्हसे, पुरुष खुल्या गटातून दिलीप घोडेकर व महादेव पवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपमधून पुरुष खुल्या गटातून सुरज पाटील, प्रदीप गवस, महिला राखीव गटातून सौ. सुजाताताई सुरज पाटील, महिला खुल्या गटातून सौ. रुपाली किसमत भगत निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिडके, पोमण, घोलप तर महाविकास आघाडीकडून परशूराम मेहेर, अजय सुपेकर, तानाजी जाधव, सौ. रोहिणी शिंदे, सौ. शालिनी म्हात्रे तर शिवसेना उबाठा गटामध्ये तात्या या नावाने सर्वांना परिचित असणारे शिवाजी महाडीक मनसेकडून निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग २३ मध्ये पुरुष खुल्या गटामध्ये सुरज पाटील आणि महादेव पवार तर महिला राखीव गटामध्ये सौ. सुजाताताई पाटील आणि सौ. सुनिता रतन मांडवे या दोन लढती लक्षवेधी ठरणार आहेत. घोडेकर-गवस अशी एका गटात लढत असली तरी या गटात अनेक उमेदवार उभे असल्याने मतविभागणीचा फटका कोणाला बसणार आणि कोणाला फायदा झाला, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रभागामध्ये १५ ते १८ टक्के सारसोळे गाव व कुकशेत गावातील मतदान असून उर्वरित मतदान सेक्टर ६,८,१०,१६, १६ अ या कॉलनी परिसरातील मतदान आहे. शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात असलेले चारही उमेदवार कॉलनी परिसरातील असून भाजपकडील चारपैकी तीन उमेदवार ग्रामस्थ आहेत. महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार ग्रामस्थ आहेत. सुरज पाटील व गणेश भगत यांचा कॉलनी परिसरातील जनसंपर्क प्रभावी असला तरी निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यत हा प्रभाव टिकून राहणे भाजपसाठी आवश्यक आहे. शिवसेनेकडे रतन मांडवे, दिलीप घोडेकर, विजय माने, महादेव पवार ही चौकडी असल्याने शिवसेनेचेही पारडे जड झाले आहे. या प्रभागातील लढतीकडे बेलापुर मतदारसंघाचे लक्ष लागले असून कोणासही ही लढत सोपी नसल्याचे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच स्पष्ट झाले आहे.

Previous Post

तिकिटवाटपात आमदार मंदाताईंना मिळालेल्या वागणुकीमुळे नवी मुंबईमधील देवाभाऊच्या लाडक्या बहीणींमध्ये नाराजी

Next Post

सानपाडा प्रभाग १९ मध्ये अपक्षांच्या मुसंडीने समीकरणात उलथापालथ

Next Post
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाडा प्रभाग १९ मध्ये अपक्षांच्या मुसंडीने समीकरणात उलथापालथ

सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाडा प्रभाग १९ मधील हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष

प्रभाग २२ मध्ये शिवसेना-भाजपा उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या नायडूंचीही चर्चा

प्रभाग २२ मध्ये शिवसेना-भाजपा उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या नायडूंचीही चर्चा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com