• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 9, 2026

सानपाडा प्रभाग १९ मधील हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

जयश्री पाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका निवडणुका जाहिर होण्यापूर्वीच सानपाड्यामध्ये पांडुरंग आमलेंच्या रुपाने प्रथमच कमळ फुलणार, अशी चर्चा राजकीय घटकांमध्ये तसेच सर्वसामान्य जनतेमध्येही सुरु होती. पांडुरंग आमले यांनी कोरोना काळाच्या अगोदरपासून जनसेवेचा सपाटा लावल्याने तसेच भाजपाच्या मागे जनाधार निर्माण करण्याचे काम केले असल्यामुळे भाजपकडून त्यांचे तिकिट निश्चित मानले जात होते. पंरतु तिकीटवाटपामध्ये त्यांना कामाच्या निकषावर नाही तर केवळ आमदार मंदाताई म्हात्रे यांचे समर्थक या एकमेव निकषामुळे डावलले गेल्यामुळे सानपाडामधील पश्चिम महाराष्ट्रातील समाज संतप्त झाला आहे. काम करुनही आपल्या माणसाला तिकिट न मिळाल्याने त्या अन्यायाची व आपल्या भागावर झालेल्या अपमानाची परतफेड करण्यासाठी सानपाड्यातील जनताच आता पांडुरंग आमलेंसाठी स्टार प्रचारक म्हणून रस्त्यावर उतरल्याचे प्रभाग १९ मध्ये पहावयास मिळत आहे.

पांडुरंग आमले यांचे तिकिट केवळ आमदार मंदाताई म्हात्रे यांचे समर्थंक या एकमेव निकषावर कापले गेल्याने सानपाडामधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वांधिक काम करुनही आपल्या माणसाचे तिकिट कापले गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेमध्ये पांडुरंग आमले यांच्याप्रती सहानूभूती वाढीस लागली आहे. सानपाडामधील इतर जनतेचेही पांडुरंग आमले यांना समर्थंन वाढू लागले आहे. भाजपने पांडुरंग आमले यांचे तिकिट कापल्याने खऱ्या अर्थांने शिंदेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. भाजपने लढवय्या असणाऱ्या पांडुरंग आमलेंनाच नाकारल्याने शिवसेनेच्या विजयाला नकळत हातभार लावला आहे.

प्रभाग १९ मध्ये पांडुरंग आमले व त्यांच्या पत्नीला निवडणूक रिंगणात सानपाडामधील जनतेने उतरविले आहे. आपल्या माणसावर अन्याय झाल्याची भावना प्रभाग १९ मधील मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अन्य उमेदवारांच्या तुलनेत पांडुरंग आमले व त्यांच्या पत्नीचा आलेख मोठा असल्याने या पॅनलमध्ये भाजपचा पराभव झाल्यास त्या उमेदवारांना तिकिट देणाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीदरम्यान नवी मुंबईतील राजकीय आखाड्यात रंगत वाढत चालली असताना सत्तेसाठी शिवसेना-भाजपमध्ये कमालीची संघर्ष निर्माण झाला आहे. सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग १९ मध्ये पांडुरंग आमले व सौ. शारदा पांडुरंग आमले हे दांपत्य अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात सहभागी झाल्याने सर्वच राजकीय समीकरणात उलथापालथ झालेली आहे.

पांडुरंग आमले हे राजकारणात भाजपचे कट्टर कार्यकर्ते असून बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय आहेत. कोरोना काळापासून सानपाडा नोडमध्ये करत असलेल्या सामाजिक कार्यामुळे पांडुरंग आमले नावारुपाला आलेले आहेत. सातत्याने विविध उपक्रम राबवित पांडुरंग आमले यांनी जनसामान्यात काम करताना भाजपचा जनाधार वाढविला आहे. धार्मिक, राजकीय, क्रिडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करत पांडुरंग आमले यांनाच भाजपचे तिकिट हमखास मिळणार, असे मानले जात असतानाच त्यांचे तिकिट कापले गेले. पांडुरंग आमले यांचे तिकिट कापले गेल्याने सानपाडामधील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली. तिकिट कापले गेल्याने सानपाडावासियांचा उद्रेक झाला व त्यांच्या आग्रहास्तव पांडुरंग आमले व त्यांच्या पत्नी सौ. शारदा आमले यांना निवडणूक रिंगणात सहभागी व्हावे लागले.  प्रभाग १९ मशील क गटातून शारदा आमले कपबशी निवडणूक चिन्हावर तर पांडुरंग आमले ड गटातून शिट्टी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. आमले परिवाराची लढाई ही स्वत:ची लढाई समजून सानपाडा येथील रहीवाशी प्रचारात सहभागी झाल्याने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांच्या तुलनेत आमले दांपत्याने प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मुसंडी मारली आहे. घरटी जनसंपर्क करताना आमले यांच्या प्रचार रॅलीमध्ये स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने स्वत:हून सहभागी होवू लागल्याने सानपाडामधील राजकीय वातावरण रंगू लागले आहे. इतके काम करुनही भाजपकडून चांगल्या कार्यकर्त्यांचे केवळ आमदार मंदाताई समर्थंक असल्याने तिकिट कापले गेल्याचा राग स्थानिक जनतेकडून व्यक्त केला जात असल्याने आमले यांना स्थानिक रहीवाशांचे समर्थंन वाढू लागले आहे. पांडुरंग आमले यांनी केलेली कामे बोलकी असल्याने व कामाचा डोंगर आमले यांनी उभा केलेला असल्याने भाजपच्या अन्य उमेदवारांना गेल्या काही वर्षात आपण काय काम केले आहे, संघटनेसाठी काय केले आहे, याचे उत्तर प्रचारात द्यावे लागणार आहे. शिवसेना-भाजप उमेदवारांहून अधिक प्रतिसाद आमलेंच्या रॅलीला मिळत असल्याने येथील लढतीकडे नवी मुंबईचे लक्ष लागले आहे.

भाजपने तिकिट दिलेल्या उमेदवारांना एकीकडे शिवसेना शिंदे गटाच्या मातब्बर उमेदवारांचा सामना करावा लागत असल्याने दुसरीकडे पांडुरंग आमले व त्यांच्या पत्नी सौ. शारदाताई आमले निवडणूक रिंगणात उतरल्याने सानपाडामधील जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागत आहे. आमले यांचे तिकिट केवळ आमदार मंदा म्हात्रे समर्थंक या एकमेव निकषावर कापले गेल्याने भाजपासाठी राबणाऱ्याला डावलले गेल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांचीही सहानूभूती पांडुरंग आमले यांना लाभली आहे. नवी मुंबईतील काही प्रभागांचा समावेश हायव्होल्टेजमध्ये झाला असून या मतदारसंघात पांडुरंग आमले व सौ. शारदाताई आमले यांना मिळणाऱ्या मतदानावरही भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post

सानपाडा प्रभाग १९ मध्ये अपक्षांच्या मुसंडीने समीकरणात उलथापालथ

Next Post

प्रभाग २२ मध्ये शिवसेना-भाजपा उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या नायडूंचीही चर्चा

Next Post
प्रभाग २२ मध्ये शिवसेना-भाजपा उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या नायडूंचीही चर्चा

प्रभाग २२ मध्ये शिवसेना-भाजपा उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या नायडूंचीही चर्चा

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

विभागात अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा उपोषण

पराभवानंतर माजी नगरसेविका सुनिता मांडवेंनी मानले मतदारांचे आभार

पराभवानंतर माजी नगरसेविका सुनिता मांडवेंनी मानले मतदारांचे आभार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com