• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 20, 2026

नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवात ‘रंगला शालेय विद्यार्थ्यां’च्या कलेचा आविष्कार – आ. मंदा म्हात्रे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवात ‘रंगला शालेय विद्यार्थ्यां’च्या कलेचा आविष्कार – आ. मंदा म्हात्रे

नवी मुंबई  : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला – क्रीडा महोत्सव २०२६’ अंतर्गत सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानावर शालेय समूह नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. सदर स्पर्धेत नवी मुंबईतील विविध शाळा तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्य, पारंपरिक लोकनृत्य तसेच बहारदार कोळीगीतांवरील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विशेष कौतुक केले.
शालेय समूह नृत्य स्पर्धेत प्राथमिक विद्या मंदिर, बेलापूर यांनी प्रथम पारितोषिक पटकावला, पीपल्स एज्युकेशन इंग्रजी माध्यम शाळा, सीबीडी बेलापूर यांनी द्वितीय पारितोषिक, तर पी. एस. सेंटर स्कूल यांनी तृतीय पारितोषिक मिळवला. तसेच गौरव स्कूल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, हा महोत्सव येत्या २५ तारखेपर्यंत सुनील गावस्कर मैदान येथे सुरू राहणार असून, या कालावधीत नागरिकांसाठी विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध असणार आहे. तरी सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत शाळकरी विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच सीबीडी मधील नागरिक व श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रिडेव्हल्पमेंटच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचे नियोजन करण्याची एमआयएमची मागणी

Next Post

महापालिका आयुक्त कैलाश शिंदेंच्या आदेशाला नेरूळ विभाग कार्यालयाकडून केराची टोपली

Next Post
नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

महापालिका आयुक्त कैलाश शिंदेंच्या आदेशाला नेरूळ विभाग कार्यालयाकडून केराची टोपली

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

आजपासून नेरूळमध्ये रंगणार आगरी-कोळी महोत्सव

नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणामध्ये क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिंटन टर्फ बनवून देण्याची युवा सेनेची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणामध्ये क्रिकेटची खेळपट्टी (पिच) व बॅडमिंटन टर्फ बनवून देण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com