नवी मुंबई : नेरूळ-जुईनगर पश्चिम परिसरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत व होर्डींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे जाताच त्यांनी हे प्रकरण Addiltional Commissioner City <addlcommcity@nmmc.gov.in>,
Addiltional Commissioner Services <addlcommservices@nmmc.gov.in>,
DMC Encroachment <dmc_encr@nmmc.gov.in>,
DMC License <dmc_license@nmmc.gov.in>,
DMC Zone 1 <dmc_zone1@nmmc.gov.in>,
DMC Zone 2 <dmc_zone2@nmmc.gov.in> यांच्याकडे वर्ग करत कारवाईचे निर्देश दिले. DMC Encroachment <dmc_encr@nmmc.gov.in>, ने यावर कारवाई करण्यासाठी AMC Nerul Ward amc_nerul_ward@nmmc.gov.in याकडे प्रकरण वर्ग केले. आयुक्त कैलाश शिंदे यांनी निर्देश दिल्याच्या घटनेला ४८ तासांचा कालावधी लोटल्यावर ना अनधिकृत बॅनर, होर्डींगवर कारवाई झाली, ना लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. अनधिकृत बॅनर व होर्डींग आजही दिमाखात झळकत असून महापालिकेचे उत्पन्न बुडाले, परिसराला बकालपणा आला. महापालिका आयुक्तांच्या निर्देशाला नेरूळ विभाग कार्यालयाचा अतिक्रमण विभाग केराची टोपली दाखवत असून आयुक्तांपेक्षा त्यांना अनधिकृत बॅनर व होर्डींग लावणारे प्रिय असल्याचे जुईनगर-नेरूळ पश्चिममधील रहिवाशांना यानिमित्ताने जवळून पहावयास मिळाले आहे.
महापालिका निवडणूक निकालानंतर सर्वपक्षीय राजकारण्यांकडून नेरूळ व जुईनगर पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डींग व बॅनर लागले. परिणामी महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर बुडाले असून परिसराला बकालपणा आला. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करत नेरूळ पश्चिम व जुईनगर परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत होर्डींग तातडीने काढणेबाबत व परिसर बकाल करणाऱ्या तसेच महापालिकेचे उत्पन्न बुडविणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
महापालिका निवडणूकीनंतर नेरूळ विभाग कार्यालयाच्या हद्दीत जुईनगर रेल्वे फाटक ते नेरूळ जीमखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डींग व बॅनर लागलेले आहेत. जुईनगरमधील बाहेरील व आतील रस्ते, चौक, नाके तसेच नेरूळ सेक्टर २,४,६,८,१०,१८, २४ परिसरात तसेच साईबाबा हॉटेल चौक, राजीव गांधी उड्डाणपुल, समाधान कॉर्नर, वाधवाकडे वळताना, नेरूळ रेल्वे स्टेशन परिसर, सेक्टर १०मध्ये प्रवेश करतानाचा चौक, सुश्रुषा रुग्णालयाकडे वळताना, सेक्टर सहामधील बाहेरील व आतील रस्ते , उद्यान, सार्वजनिक जागा सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डींग व बॅनर लागलेले आहेत. यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून परिसराला बकालपणाही आलेला आहे. अनधिकृत बॅनरवर तातडीने कारवाई करण्याचे व त्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. बॅनर लागून ७२ तास झाले तरी पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी आपण संबंधित सर्वच अनधिकृत बॅनर तातडीने हटविण्याचे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल आदेश नेरूळ विभाग कार्यालयाला देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली.
या तक्रारीची महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी दखल घेत नेरूळ विभाग कार्यालय व उपायुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश तात्काळ दिले. परंतु ४८ तास लोटल्यावरही कारवाई न झाल्याने व फौजदारी गुन्हे दाखल न करण्यात आल्याने नेरूळ विभाग कार्यालय व पालिका उपायुक्त हे महापालिका आयुक्तांच्या निर्देशाला जुमानत नसल्याचे, केराची टोपली दाखवत असल्याची चर्चा नेरूळ-जुईनगर परिसरात सुरु झाली आहे.



