नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील कै. ज्ञानेश्वर शेलार कला केंद्रात महापालिकेचे देयक भरणा केंद्र तात्काळ सुरु करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर आठ परिसरात महापालिका प्रशासनाने कै. ज्ञानेश्वर शेलार कला केंद्रात पाणी व मालमत्ता कर देयक भरण्यासाठी भरणा केंद्र सुरु केले आहे. नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव, दहा, जुईनगर नोडमधील रहिवाशांना या भरणा केंद्रामुळे घराजवळच मालमत्ता कर व पाणीपट्टी देयक भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हे भरणा केंद्र बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून संबंधितांना हे भरणा केंद्र तात्काळ सुरु करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी युवा सेनेचे सरचिटणिस निखिल मांडवे यांनी केली आहे.



