• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 22, 2026

रविंद्र सावंत यांच्या पराभवाचे कामगार वर्तुळावर सावट

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे कामगारांसाठी महापालिका, सिडको, एमआयडीसी, बाजार समिती व अन्य खासगी कारखाने-कंपन्यांमध्ये सातत्याने काम करणारे कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या पराभवाचे कामगार वर्तुळावर सावट पडले असून कामगार क्षेत्रामध्ये एका चांगल्या माणसाचा पराभव झाल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

कॉंग्रेस पक्षसंघटनेसाठी आपली हयात घालवून व पक्ष संघटना नावारुपाला आणण्यासाठी सातत्याने आंदोलने, निदर्शने करुनही पक्ष तिकिट देत नसल्याचा संतापही कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी कॉंग्रेस सोडलेली असताना पडझडीच्या काळात बेलापुर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे तारणहार बनलेले रविंद्र सावंत यांचे तिकिट कापण्यात आल्याने त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याची चर्चा कामगार वर्गात खुलेआमपणे होत आहे.

नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून महापालिकेतील कायम आस्थापनेतील, ठोक, कंत्राटी कर्मचारी तसेच तासिका शिक्षक, परिवहन विभागाचे कर्मचारी यांच्यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका मुख्यालय ते मंत्रालय सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना सुविधाही उपलब्ध करुन दिल्या आहेत. सेवेतील प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला आहे. रविंद्र सावंत निवडणूकीला उभे राहिल्यावर कामगार वर्गातून जल्लोष साजरा करण्यात आला. आपला आवाज आता महापालिका सभागृहात उठविणारा हक्काचा माणूस सभागृहात असणार असल्याचा आनंदही कामगारांकडून व्यक्त करण्यात आला होता. रविंद्र सावंत यांच्या पराभवाचे वृत्त समजताच कामगार वर्गाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र सावंत हे लढवय्ये नेतृत्व असून त्यांनी पराभवाकडे दुर्लक्ष करुन पुन्हा एकदा कामगारांसाठी व समाजासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असा सूर कामगारांकडून आळविला जात आहे.

Previous Post

अर्थसंकल्प बनविण्यापूर्वी नागरिकांकडून प्रस्ताव घेण्याची एमआयएमची मागणी

Next Post

महापौरपदासाठी मातब्बर महिला नगरसेविकांची नावाची चर्चा

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

महापौरपदासाठी मातब्बर महिला नगरसेविकांची नावाची चर्चा

रविवारी नेरूळमध्ये शिवसेनेचे रक्तदान शिबीर

रविवारी नेरूळमध्ये शिवसेनेचे रक्तदान शिबीर

‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ असे म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ असे म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com