सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी नेरुळ सेक्टर दोन परिसरात आरोग्य शिबीर व साईभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरामध्ये प्राथमिक तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाबाबत सल्ला ईसीजी, आरोग्यविषयक सल्ला व योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आदी केले जाणार आहे. वाशी तुर्भे रोडवरील मयुरेश हॉस्पिटल, डॉ. रविंद्र गोसावी यांचे सिद्धीविनायक केअर सेंटर, नेरूळ सेक्टर १० मधील निओ हेल्थ अॅंण्ड डायग्नोस्टिक यांचे आरोग्य शिबीराला विशेष सहकार्य राहणार आहे. साई भंडाऱ्यामध्ये सांयकाळी ६ वाजता श्री साईपादुकांचे पुजन, ६.३० वाजता श्री साई अभिषेक, ७ वाजता श्री साईंची धुपारती, ७.३० वाजता सुस्वर भजन, रात्री ८ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नेरूळ सेक्टर २ मधील अमरदिप, आदर्श व एलआयजी सोसायटीमधील रस्त्यावर या आरोग्य शिबिराचे व साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून नेरूळ व जुईनगरमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने आरोग्य शिबीरात व साई भंडाऱ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन साई जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रतन मांडवे, माजी नगरसेविका व प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ. सुनिता रतन मांडवे व कार्यक्रमाचे आयोजन मनोज चव्हाण यांनी संयुक्तपणे केले आहे.


