नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान उन्हाळा कालावधीत गतवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या उन्हाळा सुरु झालेला आहे. नवी मुंबईतील स्थानिक जनतेला घरामध्ये उकाडा सहन करावा लागत असल्याने ते अधिकाधिक वेळ परिसरात सार्वजनिक उद्यानामध्ये मोकळ्या हवेमध्ये घालवत असतात. नेरूळ सेक्टर आठमध्ये महापालिकेचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान गेल्या वर्षी रात्रीच्या वेळी एक तास अधिक कालावधी सुरु ठेवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही स्थानिक रहिवाशांना घरातील उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावे. घरामध्ये उन्हामुळे उकाडा सहन करावा लागत असल्याने सेक्टर आठमधील रहिवाशी अधिकाधिक वेळ राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात बसलेले असतात. वार्तालाप करत असतात. त्यामुळे यंदाही उन्हाळा कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यान रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मागणी निखील मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

