• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, March 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 7, 2026

आयुक्तांच्या भेटीत कोपरखैराणेवासियांचा संताप; जोरदार घोषणाबाजीने नाराजी व्यक्त

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आयुक्तांच्या भेटीत कोपरखैराणेवासियांचा संताप;  जोरदार घोषणाबाजीने नाराजी व्यक्त

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com

नवी मुंबई : विद्याभवन अपार्टमेंट ,प्लॉट नंबर १२ सेक्टर २ कोपरखैरणेमधील फ्लॅट नंबर ०२ ( तळ मजला) श्यामली चौधरी या घरगुती ट्युशन क्लास घेत होत्या. त्यावेळेस तिथे ११ मुले होती. सायंकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास फ्लॅटचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत मनीष म्हसे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

कोपरखैरणे सेक्टर २ येथे ट्युशन क्लास चालत असलेल्या फ्लॅटचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, यावेळी संतप्त नागरिकांनी आयुक्तांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आयुक्तांना घेरत “तुम्ही शांत बसा. तुम्ही फक्त एसीमध्ये बसता… तुम्ही जनतेला भेटत नाही. तुम्ही इथे आलेच नसते तरी चालले असते. किती पाहण्या करणार?” अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला.

नागरिकांच्या संतापामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी स्थानिकांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या कार्यपद्धतीवरही उघडपणे टीका करत त्यांचा जाहीर निषेध नोंदवला. या दुर्घटनेनंतर जबाबदारांवर कारवाई करण्याची आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Previous Post

सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com