• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, March 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 9, 2026

जनतेच्या कर रूपातून येणारा पैसा पारदर्शकतेपणे नवी मुंबईच्या विकास कामांसाठी वापरा :- आ. मंदा म्हात्रे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
जनतेच्या कर रूपातून येणारा पैसा पारदर्शकतेपणे नवी मुंबईच्या विकास कामांसाठी वापरा :- आ. मंदा म्हात्रे

नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका महीला व बालकल्याण समितीद्वारा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त “महिला उद्योजगता पुरस्कार” व स्वच्छता अभियान पुरस्कार” वितरण व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभांप्रसंगी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांची “मुख्य अतिथी” म्हणून उपस्थिती लाभली.

तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, जनतेच्या कर रूपातून जमा होणारा पैसा हा जनतेचाच असतो. त्यामुळे त्या पैशाचा वापर पूर्ण पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे नवी मुंबईच्या विकास कामांसाठी होणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालकल्याण यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये हा निधी योग्य पद्धतीने वापरला गेला तरच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य होईल.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, चौदा गाव येथे कलेक्टर लँड व गुरुचरण असे मोठ्या क्षेत्राचे भूखंड मोकळे आहेत अशा ठिकाणी जर महिलांच्या सक्षमीकरणाकरिता भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेऊन महिलांकरिता उद्योग उभारल्यास महिलांसाठी एक नवी संजीवनी निर्माण होईल व महिलांच्या हाताला एक काम मिळेल. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महापौर व उप महापौर यांना विनंती केली की, असा समाजपयोगी कार्यासाठी भूखंड उपलब्ध केले तर नवी मुंबई क्षेत्रातील महिलांचे सबलीकरण होऊन महिलांमध्ये रोजगाराची संधी निर्माण होईल. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आपण सर्वांनी निर्माण सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. समाजातील प्रत्येक महिला सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी झाली तरच खऱ्या अर्थाने प्रगती साध्य होईल. तसेच महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी आणि स्वावलंबनाच्या दिशा देण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महिला आणि बालकांचे कल्याण हेच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभूत तत्त्व आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन महिलांच्या सन्मानासाठी, समानतेसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केला व सर्व उपस्थित महिलांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी “जागतिक महिला दिनाच्या” शुभेच्छा दिल्या,

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक महापौर सुजाता पाटील, उप महापौर दशरथ भगत तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेता, समितींचे सभापती व प्रभाग समितींचे सभापती तसेच नगरसेविका, नगरसेवक आणि समस्त महिला व बालकल्याण समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आयुक्तांच्या भेटीत कोपरखैराणेवासियांचा संताप; जोरदार घोषणाबाजीने नाराजी व्यक्त

Next Post

न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत बिनविरोध

Next Post
न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत बिनविरोध

न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत बिनविरोध

आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com