• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, March 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 9, 2026

आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आरोग्य विम्याअभावी कंत्राटी कामगाराचा मृत्यू

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या मलेरिया विभागात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेले विवेक सावंत (वय ३२) याचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आरोग्य विमा किंवा त्याची सुविधा नसल्याने उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबाला धावपळ करावी लागली. त्यांच्या पश्चात पत्नी, १२ महिन्यांची मुलगी, आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. आई-वडील गावाकडे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शहरातील महागड्या उपचारांमुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

विवेकची अचानक प्रकृती बिघडल्याने महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये त्याला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तातडीने मुंबईतील मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाइ‌कांनी फोर्टिस रुग्णालयात रेफर करण्याची विनंती केली; मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना अशी सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पुढाकार घेत त्यांना वाशी येथील न्यूएरा रुग्णालयात दाखल केले. मात्र मोठा खर्च करूनही विवेक सावंत यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कंत्राटी कामगारांना किमान पाच लाख रुपयांचा तरी मेडिक्लेम देण्याची मागणी केली आहे. सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ना ईएसआयची सुविधा आहे, ना महानगरपालिकेकडून आरोग्य विमा दिला जातो. त्यामुळे अशा घटनांमध्ये कामगार कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी इतरांकडे हात पसरावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांसाठी मेडिक्लेमबाबत समिती स्थापन केली असली तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे “आणखी किती कामगारांना विम्याविना जीव गमवावा लागणार?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Previous Post

न्हावा ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश घरत बिनविरोध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com