• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 23, 2026

नेरूळ सेक्टर आठमधील महापालिकेच्या शौचालयांच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर आठमधील महापालिकेच्या शौचालयांच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात असलेल्या सार्वजनिक शौचालय तसेच आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या बाजूलाही महापालिकेचे सार्वजनिक शौचालयाच्या नुतनीकरणाच्या कामास सुरुवात करुन असुविधांचे तातडीने निवारण करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखील रतन मांडवे यांनी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर आठमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. शौचालयातील असलेली शौचाची भांडी तुटलेली आहेत. शौचालयात असलेल्या शॉवरमधून पाणी येत नाही. शौचालयाला दुरावस्था आली असून स्वच्छतेचा अभाव आहे. स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांचे निवारण करण्यासाठी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांच्या पाठपुराव्यानुसार व मागणीनुसार शौचालयाच्या नुतनीकरण कामाची महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये निविदा काढली होती. याला चार महिन्याचा कालावधी लोटला तरी पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. या शौचालयाच्या दुरावस्थेमुळे परिसराला बकालपणा आला असून तातडीने या कामाला सुरुवात होणे आवश्यक असल्याचे निखील रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या बाजूलाही महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. हे शौचालय पूर्णपणे खराब झाले असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौचालयातील समस्यांमुळे परिसराला बकालपणा आला आहे. येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी शौचालयाच्या नुतनीकरणासाठी सप्टेंबर २०२५ ला महापालिका प्रशासनाने निविदा काढली होती. या कामाला सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी कामास सुरुवात झालेली नाही.

नेरूळ सेक्टर आठ परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानात असलेले सार्वजनिक शौचालय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाच्या बाजूला असलेले महापालिकेचे सार्वजनिक शौचालय याच्या नुतनीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखील मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

विद्युत उपकेंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी

Next Post

नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये वाद्य संगीत वाजविण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर आठमधील उद्यानांत लिटरबीनच्या सुविधेसाठी युवा सेना आग्रही

नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये वाद्य संगीत वाजविण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com