• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, March 30, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 30, 2026

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे आता तरी हटवा: संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे आता तरी हटवा: संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महावितरणने काम करताना पदपथावर टाकलेले मातीचे ढिगारे तातडीने हटविण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या सीव्ह्यू सोसायटी विक्रम बार ते मेरेडियन टॉवरसमोर व सिडकोच्या शिवम सोसायटीलगत असलेल्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्रात केबल टाकण्यासाठी महावितरणने पदपथालगत खोदकाम केलेले आहे. हे खोदकाम त्यांनी बुजविले असले तरी या ठिकाणी खोदकाम करताना माती व दगडाचे ढिगारे महावितरणने पदपथावरच रचून ठेवले आहेत. या कामाला महिना लोटला तरी महापालिका प्रशासनाकडून मातीचे ढिगारे हटविण्यात आलेले नाहीत. पदपथावरुन स्थानिक जनतेला चालता येत नाही. परिसराला बकालपणा आलेला आहे. हा प्रभाग नवी मुंबईच्या महापौर सन्माननीय सौ. सुजाताताई पाटील आणि महापालिका ब प्रभाग समिती अध्यक्षा सौ. रुपाली किस्मत भगत यांचा आहे. महापालिकेच्या अकार्यक्षमपणामुळे महापौरांच्या आणि प्रभाग समिती अध्यक्षांच्या प्रभागाला बकालपणा आला असून यामुळे लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलीन होत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

या समस्या निवारणासाठी संदीप खांडगेपाटील यांनी २३ मार्च रोजी महापालिका आयुक्तांना निवेदनही सादर केले होते. आयुक्त कार्यालयाकडून ते निवेदन तात्काळ City Engineer <cityengineer@nmmc.gov.in>,
Executive Engineer Nerul <ee_nerul@nmmc.gov.in>,
DMC Zone 1 <dmc_zone1@nmmc.gov.in>,
AMC Nerul Ward amc_nerul_ward@nmmc.gov.in संबंधितांना फॉरवर्डही करण्यात आले. या घटनेला सात दिवसांचा कालावधी लोटला असून पदपथावर मातीचे ढिगारे कायम आहे. आयुक्तांच्या अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून नेरुळ सेक्टर सहामधील विक्रम बार ते शिवम सोसायटीलगत असलेल्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्रापर्यत असलेल्या पदपथावर रचण्यात आलेले मातीचे ढिगारे तातडीने हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबई महापालिकेच्या उद्यानांमध्ये वाद्य संगीत वाजविण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com