• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, March 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 31, 2026

वाशी येथे जुने सुस्थितीतील कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाशी येथे जुने सुस्थितीतील कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जुने सुस्थितीतील कपड्यांचे संकलन हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाला नवी मुंबईतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वापरून झालेले चांगल्या स्थितीतील कपडे मोठ्या प्रमाणात जमा केले.

संकलित करण्यात आलेले साधारणत: ८१३.३ किलो जुने कपडे कचऱ्यात जाण्याऐवजी त्यांना नवजीवन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्रात पाठवण्यात आले. केंद्र सरकारच्या वस्त्रद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्र समिती व नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथे वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प अत्यंत उत्तम प्रकारे राबविण्यात येत असून या प्रकल्पामध्ये जुने कपडे गोळा करून त्यांचे वर्गीकरण, प्रक्रिया तसेच त्यापासून नव्या वस्तूंची निर्मिती (अपसायकलिंग) केली जाते. यामुळे क्षेपणभूमीवर जाणारा कापडी कचरा लक्षणीय प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.

नवी मुंबई महापालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाऊंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये महिला बचत गटांतील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर भर देते येथे सोसायट्या, वसाहती, थ्री आर सेंटर्स अशा विविध ठिकाणाहून आलेल्या जुन्या कपड्यांची छाननी करून त्यांचा पुनर्वापर व अपसायकलिंग करण्यात येते. या उपक्रमामुळे कचरा व्यवस्थापनास चालना मिळत असून पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागत आहे.

वाशीतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाने या अभिनव उपक्रमात पुढाकार घेतला असून प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या सहकार्याने या कपडा संकलनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले. यावेळी प्लास्टिक कचऱ्याचेही संकलन करून ते पुनर्वापरासाठी पाठवण्यात आले. या उपक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अजय गडदे आणि उद्यान विभाग उपायुक्त स्मिता काळे यांचे मार्गदर्शन लाभले असून मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष कुळकर्णी, प्रोजेक्ट मुंबईचे अधिकारी रोहित फडतरे, टिसर ट्रस्टच्या वैशाली कदम तसेच मंडळाचे सभासद यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित करीत नवी मुंबई अधिक स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले.

May be an image of one or more people and text

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे आता तरी हटवा: संदीप खांडगेपाटील

Next Post

कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

Next Post
कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

कर्मचारी कायम सेवेचा प्रस्ताव अभिनंदनीय, पण तुर्तास वेतनवाढ करा : रविंद्र सावंत

जनतेसाठी समाज मंदिर उपलब्ध करा अन्यथा दालनात उपोषण

आयुक्तसाहेब, नेरूळ सेक्टर सहामधील समाजमंदिर स्थानिक रहिवाशांसाठी तातडीने खुले करा: संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com