• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, May 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 6, 2026

नवीन कामगार नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध

adminbyadmin
in मुंबई
0
अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत ‘ हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग : कामगार मंत्री आकाश फुंडकर

हरकती व सूचना नोंदविण्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे आवाहन

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : राज्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांचे हित, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २०२५ रोजी लागू केलेल्या नवीन चार कामगार संहितांच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्याची नियमावली तयार केली असून त्याचा मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या प्रस्तावित नियमावलीवर राज्यातील सर्व संबंधित घटकांनी आपल्या हरकती आणि सूचना कधी सूचना प्रसिद्ध झाल्याच्या ४५ दिवसांच्या आत नोंदवाव्यात, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.

केंद्र शासनाने औद्योगिक संबंध, वेतन संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता २०२०, तसेच सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अशा चार प्रमुख संहिता देशभर लागू केल्या आहेत. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्याला स्वतःची नियमावली तयार करणे आवश्यक होते. त्यानुसार, राज्य शासनाच्या कामगार विभागाने विधी व न्याय विभागाच्या अत्यंत सूक्ष्म तांत्रिक सहकार्याने ही नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचा मसुदा २८ एप्रिल ते ५ मे २०२६ या कालावधीत अधिसूचनेद्वारे जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती देताना कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले की, राज्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचा वाटा सिंहाचा असतो. त्यामुळेच त्यांच्या कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, त्यांचे आरोग्य आणि त्यांना मिळणारे वेतन या बाबींना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रस्तावित नियमावलीचा मुख्य उद्देश राज्यातील औद्योगिक शांतता टिकवून ठेवणे हा आहे. मालक आणि कामगार यांच्यातील संबंधांचे सुयोग्य नियमन करून दोघांमधील समन्वय वाढवणे, वेतनाच्या तरतुदी अधिक स्पष्ट आणि पारदर्शक करणे, ही या नियमावलीची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे केवळ कामगारांचे कल्याणच होणार नाही, तर संपूर्ण औद्योगिक वातावरणात एक प्रकारची सुसूत्रता आणि शिस्त येण्यास मदत होईल.

विशेष म्हणजे, बदलत्या काळानुसार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सच्या सुरक्षेचा विचारही या नियमावलीत प्राधान्याने करण्यात आला आहे. ही नवीन नियमावली राज्यातील औद्योगिक आस्थापनांपासून ते बांधकाम क्षेत्रापर्यंत आणि असंघटित कामगारांपर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

कामगार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ही नियमावली अंतिम करण्यापूर्वी लोकशाही मार्गाने सर्वांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालविणाऱ्या कंपन्या, गिग वर्कर, सर्व कामगार संघटना आणि वैयक्तिक स्तरावरील नागरिक यांनी या मसुद्याचा सखोल अभ्यास करावा. अधिसूचनेद्वारे दिलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी आपल्या हरकती व सूचना सादर कराव्यात.

सर्वांच्या सहभागातून एक सर्वसमावेशक आणि न्याय्य नियमावली तयार होऊन राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास ॲड. आकाश फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

आमदार प्रमोद जठार तीन दिवस कोकण दौऱ्यावर

Next Post

पुनर्बांधणीमुळे होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी

Next Post
प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन प्रकल्पामध्ये मोफत घरे देण्याची शिवसेनेची मागणी

पुनर्बांधणीमुळे होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची कोलकात्यात चार गोळ्या घालून हत्या

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची कोलकात्यात चार गोळ्या घालून हत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com