नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानातील गायब झालेल्या झोपाळ्याच्या ठिकाणी नवीन झोपाळा बसविण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात चार झोपाळे महापालिका प्रशासनाने बसविले होते. त्यापैकी एक झोपाळा त्या ठिकाणी नाही. झोपाळा तुटला असता तर तेथे बाकीचे अवशेष दिसले असते. तो त्या ठिकाणाहून गायब झाला आहे. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत असून उरलेल्या तीन झोपाळ्यातील कोण कधी उतरते व आपला नंबर लागतो, याची वाट त्यांना पाहावी लागते. त्या ठिकाणी नव्याने झोपाळा तातडीने बसविण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

