• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, July 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 22, 2026

महिन्याची २२ तारीख लोटली, तरी मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांना पगार मिळेना

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

२१ मेला खात्यात पडले केवळ दहा हजार रुपये

नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याची २२ तारीख उलटली तरी वेतन मिळालेले नाही. २१ मे रोजी सांयकाळी या कर्मचाऱ्यांच्या खात्यात केवळ १० हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने जमा करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे व याप्रकरणास झालेल्या विलंबाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई शहरामधील मूषक नियत्रंणासाठी महापालिकेचा मूषक नियत्रंण विभाग कार्यरत आहे. या विभागाचा ठेका असलेल्या कामाची मुदत संपून तीन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. महासभेत या ठेक्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे. तथापि ही वर्क ऑर्डर अद्यापि ठेकेदाराच्या हातात पडलेली नाही. आज मे महिन्याची २२ तारीख आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नाही. घराचे भाडे, मुलांचे अॅडमिशन, गावी येण्या-जाण्याचा खर्च, लग्न व अन्य कार्यक्रम यासाठी त्यांना इतरांकडून कर्ज काढण्याची वेळ आलेली आहे. आस्थापनेवरील कायम कर्मचारी व अधिकारी, ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी कर्मचारी सर्वांना वेतन वेळेवर मिळते, मात्र आजवर केवळ मूक नियत्रंण कर्मचाऱ्यांची वेतनाच्या बाबत ससेहोलपट होत आहे. याअगोदर मणी नावाचा मूषक नियत्रंण ठेकेदार असताना या कर्मचाऱ्यांना तीन ते चार महिने वेतन मिळत नव्हते. हे कर्मचारी दिवस-रात्र प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांचे आर्थिक शोषण करणे योग्य नाही. मूषक मारणे, दिवस-रात्र त्यांना शोधणे, त्यासाठी कचऱ्यामध्ये आरोग्याला धोक्यात घालणे हे काम किचकट आहे. याप्रकरणी लक्ष घालून या कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

राजमाता जिजाऊ उद्यानात झोपाळा बसविण्याची मागणी

Next Post

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची मागणी

Next Post
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

बेलापुर विधानसभा मतदारसंघातील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची मागणी

नीट पेपरफुटी; अक्षम्य घटना

नीट पेपरफुटी; अक्षम्य घटना

जुईनगर-नेरूळमधील दूषित पाणी समस्येची निवारण करण्याची कॉग्रेसची मागणी

जुईनगर-नेरूळमधील दूषित पाणी समस्येची निवारण करण्याची कॉग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com