• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 2, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 2, 2026

 नवी मुंबई महापालिकेकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
 नवी मुंबई महापालिकेकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारत सरकारने देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देत आहे. उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत उपचारादरम्यान प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत एक हजार रुपयाची मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जात आहे. केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपात मदत उद्योग समूह, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ति यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून नमुंमपा कार्यक्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सीसाईड यांच्यामार्फत नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ १, शिरवणे, कुकशेत, सानपाडा व तुर्भे येथे उपचार घेणाऱ्या एकूण १०० क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
सदर रुग्णांना या अतिरिक्त पोषण आहारामुळे यशस्वी उपचार पूर्ण करण्यास मदत होईल. सदर पोषण आहार किटच्या वितरण कार्यक्रमकरिता नमुंमपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रविण कटके तसेच रोटरी क्लबमार्फत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मकोल, क्लबचे अध्यक्ष धनंजय सरकार व आर. एस. राघवन, सचिन भोले,  नंद शाह, शैलेंद्र कुमार आदी उपस्थित होते.
तरी केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करण्यास इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी नमुंमपा आरोग्य विभाग मुख्यालय अथवा dtomhnvm@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे ‘निक्षय मित्र’ म्हणून संपर्क साधावा आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या कार्यालयात रंगला निरोप समारंभाचा सोहळा

Next Post

नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

Next Post
नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com