• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, July 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 2, 2026

नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

युवा सेनेचे सरचिटणिस निखिल मांडवे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

​स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई: शहराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनी देणाऱ्या मूळ २९ गावांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जतन करण्यासाठी युवासेना नवी मुंबई सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचा संदर्भ देत, नवी मुंबई महापालिकेने या २९ गावांमधील मुख्य गावकीच्या (ग्रामदैवत) मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी प्रति मंदिर ५० लाख रुपयांचा विशेष विकास निधी मंजूर करावा, अशी मागणी निखील मांडवे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

​१७ डिसेंबर १९९१ रोजी नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली, तेव्हा यात भूमिपुत्रांच्या मूळ २९ गावांचा समावेश करण्यात आला होता. या गावातील स्थानिक बांधवांनी दिलेल्या त्यागावरच आजचे आधुनिक नवी मुंबई शहर उभे राहिले आहे. या प्रत्येक गावाचे एक पारंपरिक ‘गावकीचे मंदिर’ असून ते गावच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे मुख्य केंद्र असल्याचे सांगत युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी अनेक मंदिरांची बांधकामे जुनी झाली असून, तिथे येणाऱ्या भाविकांसाठी सभामंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण आणि वार्षिक देखभालीची अत्यंत आवश्यकता आहे. ज्या भूमिपुत्रांच्या त्यागावर हे शहर उभे राहिले, त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकभावनेचा आदर करत मनपाच्या आगामी निधीमध्ये (बजेट) योग्य ती आर्थिक तरतूद करण्यात यावी. संबंधित विभागाला या मंदिरांचे तात्काळ सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

ज्या भूमिपुत्रांनी शहरासाठी आपले सर्वस्व दिले, त्यांच्या अस्मितेचे रक्षण झालेच पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेला गती देत, मनपा आयुक्त यावर सकारात्मक निर्णय घेतील आणि भूमिपुत्रांच्या श्रद्धास्थानांना न्याय देतील, अशी मला पूर्ण खात्री आहे, असा आशावाद निखिल मांडवे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

Previous Post

 नवी मुंबई महापालिकेकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

Next Post

सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी

Next Post
सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी

नवी मुंबई शहरातील मूळ २९ गावांमधील गावकीच्या मंदिरांना जिर्णोद्धारासाठी ५० लाख रुपये द्या

प्रभाग २३ मधील गृहनिर्माण सोसायटींना कचऱ्याचे डबे उपलब्ध करुन देण्याची मागणी

३०० कोटी वृक्षलागवडीने महाराष्ट्र होणार हरित आणि सक्षम

३०० कोटी वृक्षलागवडीने महाराष्ट्र होणार हरित आणि सक्षम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com