• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 10, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 10, 2026

मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाला भक्तीचा सलाम; बोनकोडेत महाआरती

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाला भक्तीचा सलाम; बोनकोडेत महाआरती

मोदींच्या विक्रमी देशसेवा कार्यकाळाचा नवी मुंबईत गौरव; वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महाआरती

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत देशसेवेचा प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील बोनकोडे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र म्हणून पुढे जावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहावी, अशी प्रार्थनाही वनमंत्री गणेश नाईक यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी केली.

अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक, नगरसेविका वैष्णवी नाईक, अदिती नाईक, ॲड. भारती पाटील, ॲड. सायली शिंदे, मीनाक्षी पाटील, नगरसेवक मुनावर पटेल, संदीप म्हात्रे, रविकांत पाटील, रॉबिन मढवी, माजी नगरसेवक लीलाधर नाईक तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी महाआरतीत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशाचा गौरव केला.

Previous Post

मोदींच्या नेतृत्वाला १२ वर्षांची यशस्वी तपपूर्तीनिमित्त वाशीगावात महाआरतीद्वारे दीर्घायुष्याची प्रार्थना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com