• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 21, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 21, 2026

नवी मुंबईची पहिली आंतरराष्ट्रीय झेप अबुधाबीकडे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबईची पहिली आंतरराष्ट्रीय झेप अबुधाबीकडे

१५ जुलैला पहाटे पहिले नॉनस्टॉप उड्डाण; तिकिटविक्रीला सुरुवात, प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वयम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण १५ जुलै रोजी पहाटे अबुधाबीसाठी रवाना होणार असून, त्यासाठीची तिकिटविक्री सुरू झाली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या या नॉनस्टॉप विमानसेवेमुळे नवी मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवेला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या तीन दिवशी ही सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार भविष्यात उड्डाणांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबर रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जे. के. शर्मा यांनी नुकतीच १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्या उड्डाणाची माहिती आणि तिकिटविक्रीकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते.

पहाटे २.५५ वाजता उड्डाण

एअर इंडिया एक्स्प्रेसचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान १५ जुलै रोजी पहाटे २.५५ वाजता नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करेल. हे विमान सकाळी ४.३५ वाजता अबुधाबी येथे पोहोचणार असून, प्रवासाचा कालावधी तीन तास दहा मिनिटांचा असेल. अबुधाबीसाठी जाण्या-येण्याचे तिकीट सध्या सुमारे ३२ हजार ५५० रुपयांपासून उपलब्ध आहे.

अबुधाबीहून नवी मुंबईकडे येणारे पहिले विमान सकाळी ५.४५ वाजता उड्डाण करेल आणि सकाळी १०.२० वाजता नवी मुंबई विमानतळावर दाखल होईल.

पहिल्या उड्डाणासाठी आरक्षणांचा ओघ

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक प्रवासी आणि विमानप्रेमींनी रविवारीच तिकिटांचे आरक्षण केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील नागरिकांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे आगामी काळात तिकीटदर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार

नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या विमानतळावरून कार्गो सेवा उपलब्ध असल्याने पर्यटनासह मालवाहतूक व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या देशांतर्गत विमानसेवेमुळे दररोज सुमारे १५० विमानांची हालचाल होत असून, जवळपास २० हजार प्रवासी या विमानतळाचा वापर करतात. आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाल्यानंतर ही संख्या काही महिन्यांत तिपटीने वाढण्याची शक्यता आहे.

बससेवेची मागणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अॅप-आधारित टॅक्सी चालकांच्या संपामुळे विमानतळावरून परतणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवी मुंबई व मुंबईतील प्रमुख भागांना जोडणारी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बॉक्स :

पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाची ठळक माहिती

  • उड्डाणाची तारीख : १५ जुलै
  • मार्ग : नवी मुंबई – अबुधाबी (नॉनस्टॉप)
  • विमान कंपनी : एअर इंडिया एक्स्प्रेस
  • उड्डाणाची वेळ : पहाटे २.५५
  • अबुधाबी आगमन : सकाळी ४.३५
  • प्रवास कालावधी : ३ तास १० मिनिटे
  • प्रारंभिक भाडे : सुमारे ₹३२,५५० (जाणे-येणे)
  • सेवा : आठवड्यातून तीन दिवस (बुधवार, शुक्रवार, शनिवार)

Previous Post

मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची कारवाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com