• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, June 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2026

मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविल्याप्रकरणी चौकशीची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महापालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविल्याप्रकरणी चौकशीची मागणी

पावसाळी अधिवेशनात आमदार मंदाताई म्हात्रे यांचा गंभीर मुद्दा

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com                                                                                               

नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाचे लक्ष नवी मुंबईतील अवैध बांधकामांना संरक्षण देण्यासाठी कथितपणे वापरण्यात आलेल्या बनावट स्टे ऑर्डर प्रकरणाकडे वेधले.

सभागृहात मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, नवी मुंबईतील अवैध बांधकामांवर होणारी कारवाई रोखण्यासाठी बनावट स्टे ऑर्डरचा वापर करण्यात आल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संबंधित दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच ज्या मोबाईल क्रमांकावरून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना बनावट स्टे ऑर्डर पाठवून कारवाई थांबविण्यात आली, त्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. हा प्रकार केवळ एका इमारतीपुरता मर्यादित नसून, अशाच प्रकारे शेकडो अवैध इमारतींवरील कारवाई थांबविण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, जर संबंधित व्यक्ती किंवा टोळी भूमाफियांना मदत करत असेल, तर अनेक सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांनी अनधिकृत इमारतींमध्ये घरे खरेदी करून आपला जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या प्रकरणामागील खरे भूमाफियांचे जाळे आणि अवैध बांधकामांना मिळणारे संरक्षण उघड करण्यासाठी चौकशी (सीबीआय) मार्फत करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच सदर चौकशीतून नवी मुंबईतील शेकडो संशयित बांधकामांच्या मागे नेमके कोण आहे, हे जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या गंभीर प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध बांधकामांना संरक्षण देणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करावा, अशी ठाम मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.

Previous Post

मनपा सभागृहांचे डिपॉझिट अडकल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com